शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनच्या विलंबामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:17 IST

२३४.२२ लाख हेक्टर्स : येत्या दिवसांत वेग येण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात मान्सून अपुरा पडल्यामुळे खरीपासाठीच्या पेरणीचे क्षेत्र २७ टक्क्यांनी कमी होऊन २३४.२२ लाख हेक्टर्स झाले आहे, असे सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चांगल्या पावसाचे भाकित केल्यामुळे येत्या दिवसांत पेरणीला चांगला वेग येईल अशी अपेक्षा आहे. शिवाय केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान हमी भावात लक्षणीय वाढही जाहीर केल्याचाही सकारात्मक परिणाम होणार आहे.

नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन होताच खरिपाच्या पेरणीला प्रारंभ होतो, परंतु यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे पेरणीलाही विलंब झाला व पाऊसही ३३ टक्क्यांनी कमी झाला, असे हवामान खात्याची आकडेवारी सांगते.छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, ओदिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये व इतर काही राज्यांत ही खरिपाची कमी पेरणी झाल्याचे वृत्त आहे. तूर डाळ, उडद आणि मूग यांची पेरणी अवघ्या ७.९४ लाख हेक्टर्सच्याही खाली यंदा झालेली आहे.

गेल्या वर्षी ती २७.९१ लाख हेक्टर्सवर झालेली होती. भरड धान्याची ३७.३७ लाख हेक्टर्सवर पेरणी झाली असून, ती गेल्या वर्षी ५०.६५ लाख हेक्टर्सवर झालेली होती. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, तमिळनाडू राज्यांत डाळींची लागवड कमी झालेली आहे.

तेलबियांचा विचार केला तर भुईमूग, सूर्यफूल आणि सोयाबीनची लागवड गेल्या आठवड्यापर्यंत ३४.०२ लाख हेक्टर्सवर झाली होती. तीगेल्या वर्षी ५९.३७ लाख हेक्टर्सवर झालेली होती. रोख पैसे देणाऱ्या पिकांत उसाची लागवड ५० लाख हेक्टर्सवर (गेल्या वर्षी ५१.४१ लाख हेक्टर्स) गेल्या आठवड्यापर्यंत झालेली आहे.भात लागवडही घटलीकृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यापर्यंत २०१९-२०२० वर्षात खरीप हंगामात (जुलै ते जून) २३४.३३ लाख हेक्टर्सची पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३१९.६८ लाख हेक्टर्सवर पेरणी झाली होती. खरिपातील मुख्य पीक भाताची लागवड गेल्या आठवड्यापर्यंत ५२.४७ लाख हेक्टर्सवर झाली होती. ती गेल्या वर्षी ती ६८.६० लाख हेक्टर्सवर झालेली होती.