शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

वर्गणी, कर्ज भरण्यासाठी मुख्याध्यापकांची कारकुनी शिक्षक संघटनांचा विरोध : दिवाळीला वेतन न मिळाल्याने नाराजी

By admin | Updated: October 25, 2016 00:56 IST

जळगाव : जिल्हाभरातील विविध पतपेढ्या, सोसायट्यांमधून आपल्या कार्यक्षेत्रातील जि.प.शाळांमधील शिक्षकांनी घेतलेले कर्ज, त्यांची वर्गणी भरण्याची कारकुनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाला करावी लागत आहे. या मुख्याध्यापकांचा वेळ अधिकचा खर्च होत असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याला शिक्षकांनी विरोध केला असून, हे कारकुनीचे काम पूर्वीप्रमाणे पं.स.कडे सोपविले जावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

जळगाव : जिल्हाभरातील विविध पतपेढ्या, सोसायट्यांमधून आपल्या कार्यक्षेत्रातील जि.प.शाळांमधील शिक्षकांनी घेतलेले कर्ज, त्यांची वर्गणी भरण्याची कारकुनी संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाला करावी लागत आहे. या मुख्याध्यापकांचा वेळ अधिकचा खर्च होत असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याला शिक्षकांनी विरोध केला असून, हे कारकुनीचे काम पूर्वीप्रमाणे पं.स.कडे सोपविले जावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

यातच सणासुदीच्या म्हणजेच दिवाळीनिमित्त याच महिन्यात शिक्षकांना वेतन देण्याचे शासनाचे आदेश असताना त्यालाही बगल दिली असून, अजूनही शिक्षकांना या महिन्याचे वेतन मिळालेले नाही. याबाबतही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इतर कपात परस्पर
शिक्षकांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी व व्यवसाय कराची रक्कम पं.स.स्तरावरून परस्पर निकषानुसार केली जाते.

सोसायट्यांचे कर्ज, वर्गणी कपातीचे काम मुख्याध्यापकाला
इतर रकमांची कपात पं.स.स्तरावर केली जात असली तरी शिक्षकांचे ग.स., धुळे नंदुरबार सरकारी नोकरांची बँक, पारोळा शिक्षक पतपेढी, भुसावळ नूतन प्राथमिक शिक्षकांची पतपेढी या सोसायट्यांतर्फे घेतलेल्या कर्जाचा हप्ता, त्यांची वर्गणी आदी मात्र पं.स.स्तरावरून कपात न होता त्यासंबंधीची कपात, कार्यवाही करायची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांच्या मुख्याध्यापकाला दिली आहे.
मुख्याध्यापक वेतन प्राप्त झाल्यावर यादी तयार करून आपल्या शाळेतील शिक्षकांचा कर्ज हप्ता, वर्गणीसंबंधीचा धनादेश तयार करतो व तो संबंधित सोसायटीमध्ये जमा करतो. त्यात मुख्याध्यापकांचा सोसायटीमध्ये चकरा माराव्या लागतात. महिला मुख्याध्यापकांना याचा अधिकचा त्रास होत आहे.

नॉन सॅलरी खात्याबाबतही गोंधळ
सध्या शिक्षकांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे होते. त्यासाठी मुख्याध्यापकांचे नॉन सॅलरी खाते अद्ययावत करायची सूचना वेतन जमा होत असलेल्या बँकांनी दिली आहे. परंतु काही शिक्षकांचे नॉन सॅलरी खाते हे व्यवहार बंद झाल्याने बंद आहेत. ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित बँकेकडून पाच हजार रुपये ठेव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतही शिक्षकांनी आक्षेप घेतले आहेत.




ज्या कपाती पूर्वी पं.स.स्तरावरून होत होत्या त्या आता मुख्याध्यापकांना कराव्या लागतात. धनादेश तयार करणे, ते सोसायटीत जमा करणे व काही चूक झाल्यास तीला सामोरे जाणे. अशा समस्यांना मुख्याध्यापकांना तोंड द्यावे लागते. जे काम पं.स.स्तरावरून सहज होते ते करण्यासाठी जिल्हाभरातील १८०० मुख्याध्यापकांना वणवण करावी लागते.
-विलास नेरकर, अध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक संघ