शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने मृत मुलीचं प्रेत हातगाडीवरून नेलं घरी

By admin | Updated: July 4, 2017 11:29 IST

आपल्या मृत मुलीचं प्रेत घरी नेण्यासाठी हातगाडी भाड्याने घेण्याची वेळ एका कुटुंबावर आली होती.

ऑनलाइन लोकमत

चंदीगड. दि. 4- आपल्या मृत मुलीचं प्रेत घरी नेण्यासाठी हातगाडी भाड्याने घेण्याची वेळ एका कुटुंबावर आली होती. छत्तीसगडमधील राजनंदगावात ही घटना घडली आहे. हॉस्पिटलमध्ये मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी हॉस्पिटलने वेळेवर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप त्या कुटुंबाने केला आहे. बख्रु टोला या गावात हे कुटुंब राहतं आहे. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.  
 
रविवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली आहे. या कुटुंबातील 17 वर्षाच्या मुलीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्या कुटुंबाने तिला जिल्ह्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारा दरम्यान त्या मुलीची मृत्यू झाला त्यानंतर तिचा मृतदेहाचं पोस्टमार्टेम करण्यासाठी हॉस्पिटलने 750 रूपयांची लाच मागितली होती. मुलीच्या कुटुंबियांनी लाच द्यायला नकार दिल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून पुढील इतर गोष्टींमध्ये दिरंगाई करण्यात आली. दुपारी बारा वाजता त्या मुलीचं पोस्टमार्टेम झाल्यानंतर घरी जाण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलकडे अॅम्ब्युलन्सची मागणी केली.  पण त्यांना काही वेळासाठी थांबण्याचं हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. 
 
अॅम्ब्युलन्स मिळण्याची दोन तास वाट पाहिल्यानंतर मृतदेह हातगाडीवर घरी नेण्याचं त्या मुलीच्या कुटुंबियांनी ठरवलं. "दुपारी पावणे तीन वाजता आम्ही मुलीचा मृतदेह हातगाडीवरून घरी घेऊन जात होतो. गुरूनानक चौकात पोहचल्यानंतर हॉस्पिटलकडून अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली पण आम्ही त्याला नकार दिला, अशी माहिती मुलीच्या कुटुंबियांनी दिली आहे. 
 
मृत मुलीचा मृतदेह अॅम्ब्युलन्स न दिल्याने हातगाडीवरून न्यावं लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात निदर्शन केली. 
 
"हॉस्पिटलमध्ये असलेल्या दोन्ही अॅम्ब्युलन्स व्यस्त असल्याने आम्ही त्या कुटुंबाला थांबायला सांगितलं होतं. दुपारी 2.45 वाजता मुलीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी लगेचच तो हातगाडीवर नेला. त्यानंतर 3.15 वाजता आम्ही त्यांना गाडी उपलब्ध करून दिली पण त्यांनी त्यासाठी नकार दिला, अशी माहिती जिल्हाधिकारी भिम सिंग यांनी दिली आहे. 
 
दरम्यान, याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. दाना मांझी या व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन न्यावा लागल्याची घटना घडली होती. तसंच ओडिसामध्ये एका पित्याला आपल्या पोटच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किमी प्रवास करावा लागला होता.