सिद्धेश्वर संस्थेचे संचालक मंडळ अपात्र झाल्याने बरखास्तीचा आदेश कायम
By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST
* ॲड. विश्वास चुडमुंगे यांची माहितीइचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील सिद्धेश्वर हातमाग विणकर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील अध्यक्ष व संचालक मंडळ अपात्र झाल्याने बरखास्तीचा आदेश कायम ठेवण्यात आला असल्याची माहिती ॲड. विश्वास चुडमुंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.या संस्थेच्या सन २०१२-१३ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नऊ सदस्यांपैकी सात ...
सिद्धेश्वर संस्थेचे संचालक मंडळ अपात्र झाल्याने बरखास्तीचा आदेश कायम
* ॲड. विश्वास चुडमुंगे यांची माहितीइचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील सिद्धेश्वर हातमाग विणकर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील अध्यक्ष व संचालक मंडळ अपात्र झाल्याने बरखास्तीचा आदेश कायम ठेवण्यात आला असल्याची माहिती ॲड. विश्वास चुडमुंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.या संस्थेच्या सन २०१२-१३ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नऊ सदस्यांपैकी सात हे पोटनियमानुसार सभासद होऊ शकत नाहीत. तसेच सभासद बदल प्रस्ताव जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी मंजूर केलेला नाही. त्यामुळे मे जॉईन्ट रजिस्टार को-ऑप. सोसायटी कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी यापूर्वी झालेला संचालक मंडळ अपात्र झाल्याने बरखास्तीचा आदेश कायम ठेवला. (प्रतिनिधी)