शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या झालेल्या अपमानामुळे मंडपातच नवरी मुलीने मोडले लग्न

By admin | Updated: April 23, 2017 09:49 IST

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्रच येणे नव्हे तर दोन कुटुंब या नात्याने जोडली जातात.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 23 - लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्रच येणे नव्हे तर दोन कुटुंब या नात्याने जोडली जातात. कुटुंब जर हे समाजाचं एकक समजलं तर पती आणि पत्नीवर दोन्ही कुटुंबाची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी येऊन पडते. पण लखनऊमध्ये नवरीमुलीने आपल्या वडिलांचा झालेला अपमान पाहून भर मांडवातच लग्नाला नकार दिल्याची घटना घडली आहे. हुंड्यामुळे अथवा नवरदेवाने मद्य प्राशन केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे लग्न मोडल्याचे आपण अनेकवेळा ऐकले असेल. भारतात अशा घटना घडू शकतात. माध्यमांच्या वृत्तानुसार, लखनऊपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या कुर्मापूर गावात 14 एप्रिल रोजी एक लग्न होते. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. वऱ्हाडी मंडळी वाजत-गाजत आले होते. त्याचदरम्यान नवरदेवाचा भाऊ आणि नववधूच्या पाहुण्यांमध्ये वाद सुरू झाला. नवरदेवाचा चुलत भाऊ मनोजने दोन रसगुल्ल्यांची मागणी केली. पण नवरीमुलीच्या पाहुण्यांनी रसगुल्ले देण्यास विरोध करत फक्त एकच रसगुल्ला मिळेल, असे म्हटले. त्यानंतर दोन्ही पाहुण्यांमध्ये भांडणास सुरूवात झाली. दोन्ही पाहुण्यांचा वाद येवढा विकोपाला गेला की, हातातल्या प्लेट्सही एकमेकांकडे फेकून मारण्यात आल्या. जेव्हा ही गोष्ट नवरदेव व नवरीमुलीच्या वडिलांना कळली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी मनोज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नवरीमुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. अखेर हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी हा वाद मिटवून लग्न लावण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा या वादाची माहिती नवरीमुलीला समजली तेव्हा तिने लग्नालाच नकार दिला. आपल्या वडिलांचा झालेला अपमान आणि त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे नवरीमुलीने लग्नासच नकार दिला.