शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या भीतीने बारचालकासह चौघांनी केली दुबेची हत्या लव्हबर्ड बार: आणखी दोन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2015 21:23 IST

भाईंदर : मीरा रोडच्या व्हाइट हाऊस बारवर झालेल्या कारवाईप्रमाणे लव्हबर्ड बारवरसुद्धा कारवाई होण्याच्या भीतीने बारचालक महेश शे˜ीने मॅनेजर व दोन ग्राहकांच्या मदतीने स्थानिक पत्रकार राघवेंद्र दुबेची हत्या केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीतून उजेडात आला आहे. याप्रकरणी त्या दोन ग्राहकांना पोलिसांनी १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली आहे.

भाईंदर : मीरा रोडच्या व्हाइट हाऊस बारवर झालेल्या कारवाईप्रमाणे लव्हबर्ड बारवरसुद्धा कारवाई होण्याच्या भीतीने बारचालक महेश शे˜ीने मॅनेजर व दोन ग्राहकांच्या मदतीने स्थानिक पत्रकार राघवेंद्र दुबेची हत्या केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीतून उजेडात आला आहे. याप्रकरणी त्या दोन ग्राहकांना पोलिसांनी १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली आहे.
शहरात अनधिकृत बार वाढत असताना मीरा रोड येथील सिल्व्हर पार्क परिसरात असलेला लव्हबर्ड हा डान्स बारदेखील अनधिकृतपणे सुरू आहे. याविरोधात स्थानिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे बारचा परवाना रद्द करण्याचा पत्रव्यवहार केला होता. ही कारवाई होण्यासाठी दुबेनेदेखील तक्रारी केल्याने त्याचे महेशसोबत नेहमी खटके उडत होते. १६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास व्हाइट हाऊस बारवर झालेल्या कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या संतोष मिश्रा, शशी शर्मा व अनिल नोटीयाल या स्थानिक पत्रकारांवर बारचालक गणेश कामतसह १३ जणांनी हल्लाबोल केला. त्यातील मिश्रा याचा संपर्क होत नसल्याने पोलिसांनी दुबे याला पोलीस ठाण्यात बोलवले होते. मध्यरात्री २ वा.च्या सुमारास तो पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तो पहाटे ५ वा.च्या सुमारास घटनास्थळी गेला होता. त्या वेळी त्याने व्हाइट हाऊसनंतर लव्हबर्ड बारवरदेखील कारवाई होण्याची शक्यता एका मित्राकडे व्यक्त केली असता ते महेशने ऐकले. अगोदरच दोघांत वाद व त्यात व्हाइट हाऊस बारचालकाने पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचा फायदा घेऊन दुबेची हत्या केल्यास त्याचे प्रकरण व्हाइट हाऊसच्या हल्लेखोरांवरच शेकेल, या शक्यतेने महेशने मॅनेजर भावेश मोमानी, बारमधील नेहमीचे ग्राहक अविनाश निरंजन मिश्रा व समाधान ऊर्फ बाबू नामदेव माळी, दोघेही रा. कांदिवली, मुंबई यांच्यासोबत मोटारसायकलने जाऊन रिक्षातून जाणार्‍या दुबेला एस.ए. लॉजजवळ रोखून लाकडी व लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्याची हत्या केली. हल्लेखोर मीरा रोड भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा मागोवा घेऊन त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे उपअधीक्षक सुहास बावचे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
...