शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे कळवण तालुक्यातील दुग्ध व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: December 21, 2015 00:02 IST

निवाणे : कळवण तालुक्यातील पशू व्यवसायावर व दुग्ध व्यवसायावर यंदाच्या दुष्काळाची वक्रदृष्टी पडलेली दिसून येत आहे. अल्पप्रमाणात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले, कोल्हापूर टाईप बंधारे कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अपुर्‍या पाण्यामुळे पिकावर अनिष्ठ परिणाम झाला आहे. चाराटंचाई निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम पशुपालन व त्यावर अवलंबून असलेल्या दुग्धव्यवसायावरही झालेला दिसून येत आहे.

निवाणे : कळवण तालुक्यातील पशू व्यवसायावर व दुग्ध व्यवसायावर यंदाच्या दुष्काळाची वक्रदृष्टी पडलेली दिसून येत आहे. अल्पप्रमाणात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले, कोल्हापूर टाईप बंधारे कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अपुर्‍या पाण्यामुळे पिकावर अनिष्ठ परिणाम झाला आहे. चाराटंचाई निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम पशुपालन व त्यावर अवलंबून असलेल्या दुग्धव्यवसायावरही झालेला दिसून येत आहे.दुग्ध व्यवसायही मंदित आला आहे. परिणामी बाजारात दुधाचे भाव वाढले आहेत. पाऊस कमी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यापासून मिळणार्‍या चार्‍याचा तुटवडा भासत आहे. परिसरातील काही भागात जनावरांना पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. निवाणे, दहाणे, मटाणे, भेंडी, सिरसमणी, ओतूर, कुंडाणे, भुसणी, आंडबे, गोवापूर, नांदुरी, कळमळे, एकलहरे, पाळे, वरवंडी, शिंदेवाडी, नरूळ, महेदर, जिराडे आदि गावांसह परिसरातील पशुपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे.परराज्यातून आलेले पशुपालक काठेवाडीदेखील यंदाची दुष्काळी परिस्थिती बघून थक्क झाले आहेत. कमी पडलेल्या पावसामुळे पडीत जमिनी व वनविभागाच्या हद्दीतदेखील चारा राहिलेला नाही. नदी, नाले, बंधारे काही अंशी कोरडे झाले आहेत, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी काठेवाडी समाजाला पशुधन जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.या वर्षाच्या दुष्काळामुळे पशुपालक मेंढपाळही चार्‍यासाठी वणवण भटकत आहेत. चारा व पाणी मिळेल त्या ठिकाणी कुटुंबासह राहून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशा विविध समस्यांमुळे कळवण तालुक्यातील दुग्ध व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)