वेगळाच चित्रपट दाखवल्याने प्रेक्षकांना दुप्पट पैसे
By admin | Updated: June 7, 2014 00:36 IST
वेगळाच चित्रपट दाखवल्याने प्रेक्षकांना दुप्पट पैसे
वेगळाच चित्रपट दाखवल्याने प्रेक्षकांना दुप्पट पैसे
वेगळाच चित्रपट दाखवल्याने प्रेक्षकांना दुप्पट पैसेमुंबई : गोराईतील एका मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये फलकावर जाहिरात असलेला चित्रपट न दाखवता वेगळाच चित्रपट दाखवल्याने संतप्त झालेल्या प्रेक्षकांना अखेर चित्रपटगृहाने दुप्पट पैसे देऊन प्रकरण शांत केले़येथील मॅक्सस मॉलमध्ये हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला़ येथे चार पडदा मल्टिप्लेक्स आहे़ त्यातील एका ठिकाणी फिल्मिस्थान चित्रपटाचा फलक होता़ अपेक्षेप्रमाणे रात्री दहाच्या शोसाठी प्रेक्षकांनी या चित्रपटाचे टिकीट विकत घेतले़ थिएटर जवळपास भरले होते़ प्रत्यक्षात मात्र तेथे हिरोपंती चित्रपट दाखवण्यात आला़ याने प्रेक्षक संतप्त झाले़, अशी माहिती ऋषीकेश मोरे या प्रेक्षकाने लोकमतला दिली.प्रेक्षकांनी थेट व्यवस्थापन अधिकार्यांची भेट घेतली़ त्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे हिरोपंती चित्रपट दाखवला जात असून आता फिल्मिस्थान चित्रपट दाखवण्यात येईल, असे या अधिकार्यांनी प्रेक्षकांना सांगितले़ तरीही बराच वेळ निघून गेल्यानंतर अखेर फिल्मिस्थान चित्रपट दाखवला जाणार नसल्याचे अधिकार्यांनी जाहिर केले़ याने प्रेक्षक अधिकच संतप्त झाले़ तांत्रिक बिघाड असल्याचे आधी ज्ञात होते तर टिकीट विक्री का केली, असा सवाल प्रेक्षकांनी व्यवस्थापन अधिकार्यांना केला़ यावरून तेथे वादावादी झाली़ प्रेक्षकांनी नवीन चित्रपट दाखवा अथवा दुप्पट पैसे परत करा, अशी मागणी केली़ त्यावेळी व्यवस्थापनाने केवळ टिकीटाचे पैसे मिळतील, असे जाहिर केले़ तेव्हा काही प्रेक्षक मुळ टिकीटाचे पैसे घेऊन माघारी गेले़ तरी काही प्रेक्षक दुप्पट पैसे देण्याच्या मागणीवर ठाम राहिले़ अखेर व्यवस्थापनाने उर्वरित प्रेक्षकांना दुप्पट पैसे देऊन प्रकरण शांत केल्याचे मोरे यांनी सांगितले.