शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विलंबामुळे ‘अर्जुन’च्या खर्चात अनेक पट वाढ

By admin | Updated: August 6, 2015 22:45 IST

सन १९७४ मध्ये हाती घेतलेला अर्जुन रणगाडा प्रकल्प १९९५ मध्ये पूर्ण झाला. या विलंबामुळे या योजनेवरील खर्च १५.५० कोटी रुपयांवरून ३०५.६० कोटी रुपयांवर

नवी दिल्ली : सन १९७४ मध्ये हाती घेतलेला अर्जुन रणगाडा प्रकल्प १९९५ मध्ये पूर्ण झाला. या विलंबामुळे या योजनेवरील खर्च १५.५० कोटी रुपयांवरून ३०५.६० कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला. संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) मुख्य युद्ध रणगाडा (एमबीटी) अर्जुन प्रकल्प मार्च १९९५ मध्ये १२ मूळ नमुने (प्रोटोटाईप) आणि १५ उत्पादनपूर्व शृंखला (पीपीएस) रणगाड्यांच्या लष्करातील समावेशासह यशस्वीपणे पूर्ण केला.संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरादाखल गुरुवारी ही माहिती दिली. पर्रीकर यांनी सांगितले की, १९७४ मध्ये अर्जुन रणगाडे प्रकल्पासाठीचा प्राथमिक मंजूर खर्च १५.५० कोटी रुपये होता. १९८०मध्ये त्यात वाढ करून तो ५६.५५ कोटी रुपये करण्यात आला होता. १९८७ मध्ये २८०.८० कोटी रुपयांचा अंदाजे खर्च निश्चित करण्यात आला. त्यानुसार डीआरडीओने जनरल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेन्टस् (जीएसक्यूआर-४६७) आणि प्रकल्पासाठी संशोधन कार्य क्षेत्राच्या (स्कोप) आधारावर मंजुरी मिळवली होती. अखेर मार्च १९९५ मध्ये ३०५.६० कोटी रुपयांच्या वाढीव खर्चासह ही योजना पूर्ण झाली. डीआरडीओ अर्जुन रणगाड्यांवर अनेक वर्षांपासून काम करीत आहे का?, अर्जुन रणगाड्यांच्या विकासावरील खर्चात एकूण किती वाढ झाली?, लष्कराने रणगाड्यांची संख्या पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून नव्या पिढीच्या रणगाड्यांचा तपशील मागितला आहे, हे खरे आहे का? असेल तर त्याबाबतचा तपशील काय आणि डीआरडीओ अर्जुन रणगाड्यांचा पुरवठा करण्याच्या स्थितीत आहे वा नाही, याची प्रतीक्षा न करण्याचे कारण काय? अर्जुन रणगाड्यांचे भविष्य काय? असे प्रश्न दर्डा यांनी विचारले होते. यावर पर्रीकर यांनी सांगितले की, लष्कराने ‘फ्यूचर रेडी कम्बॅट व्हिकल’(एफआरसीए)साठी एका डिझाईन प्रतिस्पर्धेसाठी तपशील मागितला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)