शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

'डील' संपुष्टात, आमिरचे कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यास स्नॅपडीलचा नकार

By admin | Updated: February 5, 2016 12:42 IST

देशातील असहिष्णूतेच्या मुदयावरून केलेले वक्तव्य आणिरला खूप महागात पडले असून स्न२पडीलने आमिरचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यास नकार दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ - पहिले ' अतुल्य भारत' मग रस्ते सुरक्षा मोहिम, त्यानंतर टाटा स्काय आणि आता ' स्नॅपडील'.. एकेकाळी सर्व ब्रँड्सना हवाहवासा असलेला अभिनेता आमिर खान आता कोणालाही नको आहे. देशातील असहिष्णूतेच्या मुदयावरून आमिरने केलेले वक्तव्य त्याला अतिशय महागात पडले असून इतर ब्रँड्ससह आता त्याला 'स्नॅपडील'चे ब्रँड अॅम्बेसेडरपदही गमवावे लागले असून कंपनीने त्याचे कॉन्ट्रॅक्ट वाढवून न देण्याचा निर्णय घेतला आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरचा या ई-कॉमर्स कंपनीशी असलेला एक वर्षाचा करार या महिन्याखेरीस सपुंष्टात येणार असला तरी त्याला आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळणार होती. मात्र आता कंपनीने तसे करण्यास नकार दर्शवत हा करार संपवण्याचा निर्णय घेतला' असे एका अधिका-याने सांगितल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.  मात्र असे असले तरी कंपनी आता खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने आमिरऐवजी दुस-या कोणत्याही सेलिब्रिटीलाही ब्रँड अॅम्बेसेडर नेमणार नाही. तर सध्या असलेल्या ग्राहकांनाच टिकवणे, नवनवीन कॅटॅगरीज लाँच करणे आणि वेगेवगळ्या योजनांद्वारे ग्राहकांना खरेदीस उद्युक्त करणे, यावर त्यांचा भर असेल. 
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात असहिष्णूतेच्या मुद्यावरून आमिरने केलेल्या वक्तव्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते. त्या प्रकरणावरून झालेल्या वादानंतर स्नॅपडीलने आमिरच्या जाहिराती दाखवणेही बंद केले होते. 
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आमिरने असहिष्णूतेच्या मुद्यावर वक्तव्य केले होते. तसेच या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले होते. पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी त्याच्यावर टीका करत त्याला देश सोडून जायचा सल्लाही दिला होता.