चंदीगड : गाय आणि गोमांसावरून देशभरात निर्माण झालेले वादळ अद्याप शमले नसतानाच हरियाणाच्या एका मंत्र्याने गायीच्या दुधाचे महत्त्व विशद करताना चित्रपट नट्यांवर टिपणी केली आहे. गायीचे दूध पीत असल्यानेच या नट्या स्लीम आणि फिट राहतात, असा जावईशोध हरियाणाचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड यांनी लावला आहे. यमुनानगरमध्ये राष्ट्रीय गोविज्ञान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
गायीच्या दुधामुळेच नट्या ‘स्लीम’
By admin | Updated: November 3, 2015 02:12 IST