सिमला : हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील हानोगीजवळ मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने किरतपूर-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने बाजौरा-कोटला मार्गे वाहतूक वळविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. या महामार्गावर उंच पर्वतावरील मोठमोठे दगड अचानक घरंगळत खाली आले. हे दगड महामार्गावर येऊन पडल्याने रस्ता बंद झाला. दरडी कोसळत असताना सुदैवाने एकही वाहन रस्त्यावर नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
दरडी कोसळल्याने किरतपूर-मनाली मार्ग बंद
By admin | Updated: December 8, 2015 02:30 IST