शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दलितांवरील अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते

By admin | Updated: October 19, 2016 06:55 IST

स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते

लुधियाना : स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काढले. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असेही पंतप्रधान म्हणाले.गुरू गोविंदसिंग यांनी जातियवाद आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध आवाज उठविला होता, याचा उल्लेख करून ते म्हणाले की, समाजातील विसंगतींमुळेच आजही देशात दलित बंधू भगिनींवर अत्याचार होत असल्याचे आजही आपल्या कानावर पडते, तेव्हा मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. स्वातंत्र्याला आता ७0 वर्षे झाली आहेत. त्यामुळे अशा विसंगती, विषमता व अत्याचार थांबलेच पाहिजेत. (वृत्तसंस्था)>उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील उद्योजकांना साह्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हब (उपक्रम)चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, या हबद्वारे दलित आणि आदिवासी तरुणांमधील उद्योजकतेला वाव दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरि मदत केली जाईल. या योजनेतून किमान साडेतीन लाख नवे उद्योजक तयार व्हावेत, अशी सरकारची इच्छा आणि प्रयत्न आहेत. स्टार्टअप योजनेखाली राष्ट्रीयीकृत बँकांनी या उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज द्यावे आणि त्यात महिलांचाही समावेश असावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.>आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग लघु, मध्यम व अतिसुक्ष्म मंत्रालयाची ही योजना आहे. सुरुवातीला योजनेसाठी ४९0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलित व आदिवासी उद्योजकांना अर्थसाह्य मिळवून देणे, त्यांना उत्पादने तयार करण्यासाठी मदत करणे, तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे काम या हबतर्फे केले जाणार आहे. दलित आणि आदिवासींनी तयार केलेल्या उत्पादनांपैकी किमान ४ टक्के वस्तू विविध मंत्रालये तसेच राज्य सरकारे यांनी विकत घ्यावीत, असे सांगून मोदी म्हणाले की समाजातील या मागास वर्गाच्या विकासासाठी त्यांची आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्न करेल.