शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे लोकसभेत सरकारची फजिती

By admin | Updated: May 5, 2016 02:47 IST

रेल्वे मंत्रालयाशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हे दोघेही अनुपस्थित असल्याने लोकसभेत बुधवारी केंद्र सरकारची

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हे दोघेही अनुपस्थित असल्याने लोकसभेत बुधवारी केंद्र सरकारची चांगलीच फजिती झाली. भविष्यात अशा घटना घडता कामा नयेत, असा कडक इशारा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना द्यावा लागला. अध्यक्ष महाजन यांनी प्रश्नोत्तराच्या तासात रेल्वे मंत्रालच्या ‘गो इंडिया स्मार्ट कार्ड’ या कार्यक्रमाचा मुद्दा चर्चेला घेतला त्यावेळी ही घटना घडली. यावेळी प्रभू किंवा सिन्हा यापैकी कुणीही लोकसभेत हजर नव्हते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस सदस्यांनी दोन्ही मंत्री अनुपस्थित असल्याबद्दल तीव्र निषेध केला. रेल्वे मंत्रालयाशी संबंधित प्रश्न सूचीत असताना दोन्ही मंत्री अनुपस्थित का आहेत, असा सवाल काँग्रेस सदस्यांनी केला.मंत्री अनुपस्थित राहण्याची ही काही पहिली वेळ नाही. मंत्री नियम पाळत नाहीत. याआधी कॅबिनेट मंत्री अनुपस्थित होते त्यावेळी आम्ही गप्प राहिलो. सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी मंत्र्यांची उपस्थिती आवश्यक आहे, असे खरगे म्हणाले. मंत्रीद्वय अनुपस्थित राहिल्याबद्दल लोकसभाध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली. ‘हे बरोबर नाही. कॅबिनेट मंत्री कुठेतरी व्यस्त आहेत असे सांगण्यात आले होते. त्यामुळे राज्यमंत्री येथे होते. पण तेही सभागृहाबाहेर निघून गेले आहेत असे वाटते, असे पुन्हा घडता कामा नये. मंत्र्यांनी कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहिलेच पाहिजे,’ असा इशाराही त्यांनी दिला.