शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

देशव्यापी ‘बंद’ने औषध विक्री ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 03:09 IST

आॅनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सुमारे आठ लाख औषध विक्रेत्यांच्या बुधवारच्या एक दिवसीय संपामुळे औषध विक्री पूर्णपणे ठप्प झाली.

नवी दिल्ली/मुंबई : आॅनलाइन औषध विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सुमारे आठ लाख औषध विक्रेत्यांच्या बुधवारच्या एक दिवसीय संपामुळे औषध विक्री पूर्णपणे ठप्प झाली. आॅनलाइन औषध विक्रीने किरकोळ औषध उद्योगाला जबर हादरा दिला असून नियम डावलून होत असलेली विक्री रुग्णांसाठी जोखमीची ठरू शकते, असा इशारा आॅल इंडिया केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट संघटनेने (एआयओसीडी) दिला आहे. महाराष्ट्रातील ५५ हजार किरकोळ औषध विक्रेत्यांसह देशभरातील सुमारे आठ लाख औषध विक्रेते संपात सहभागी झाले व संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा एआयओसीडीचे अध्यक्ष जे.एस. शिंदे यांनी केला.गर्भनिरोधक गोळ्या, झोपेच्या गोळ्या आणि स्टेरॉईडसची आॅनलाईन विक्री धडाक्यात सुरू आहे. १० अब्ज डॉलरची भारतीय औषध बाजारपेठ काबीज करण्यासाठी अनेक कंपन्यांनी आॅनलाईन औषध विक्रीत उडी घेतली आहे. वन एमजी, झिगी यासारख्या नोंदणीकृत ई- फार्मसीजनी औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी आॅनलाईन प्रिस्क्रिप्शनवर निगराणी ठेवण्यासाठी फार्मासिस्टची चमू स्थापन केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भारतात ई- रिटेलरसाठी विशिष्ट नियम नसल्यामुळे आॅनलाईन विक्रेत्यांनी कोणतीही शहानिशा न करताच औषध पुरविण्याचा सपाटा लावला आहे. आॅनलाईन विक्रीमुळे औषध दुकानातील विक्रीवर ४० ते ५० टक्के परिणाम झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. रुग्णांना आणीबाणीच्या काळात औषधे खरेदी करता यावी यासाठी पोस्टर्स आणि वृत्तपत्रांमधून खास टेलिफोन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले. रुग्णालयांमधील औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने हा संप ९८ टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. संपादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषधमंत्री गिरीष बापट आणि एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. औषधांची आॅनलाइन विक्री या गंभीर मुद्द्याकडे सरकार लक्ष देईल. जनतेच्या आरोग्याला यामुळे धोका आहे. एक महिन्यात यावर निर्णय घेण्यात येईल. अंतिम निर्णय होण्याआधी तुमची भेट घेऊ . असे प्रकार आढळल्यास सरकारकडे तक्रार नोंदवा. त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष जे.एस. शिंदे यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>>ई-फार्मसी संघटनाही मैदानातऔषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपानंतर बेकायदा आॅनलाइन विक्रीच्या विरोधात ई-फार्मसी क्षेत्रातील खासगी कंपन्यांनी भारतीय इंटरनेट फार्मसी असोसिएशन (आयआयपीए) ही संघटना स्थापन केली. माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ तसेच औषधी नियमन २०१५ नुसार औषधांची विक्री केली जावी. ई-व्यापारातील कंपन्यांचा प्रसार आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी नियमांचे पालन केले जावे, असे या संघटनेने निवेदनात स्पष्ट केले.>>आॅनलाइन औषध विक्रीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी उपसमिती स्थापन केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले.>>24 तासांच्या संपाची सर्वसामान्य रुग्णांना मोठी झळ बसली. केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या औषध दुकानांमध्ये औषध खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून आली.