शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाकडे आपत्ती म्हणून का पाहिलं जात नाही ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

By admin | Updated: April 13, 2016 14:22 IST

दुष्काळ नैसर्गिक आपत्ती असून दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली का आणलं जाऊ शकत नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १३ - दुष्काळ नैसर्गिक आपत्ती असून दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली का आणलं जाऊ शकत नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली आहे. दहा राज्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहता न्यायालयाने ही विचारणा केली आहे. दुष्काळाला  आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आणल्यास पिडीत कुटुंबांच्या मदतीसाठी निधी दिला जाऊ शकतो असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
 
अनेक राज्यांनी अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर केलेला नाही त्यामुळे न्यायाधीश मदन लोकूर आणि रामाना यांच्या खंडपीठाने ही संकल्पना मांडली आहे. दुष्काळ जाहीर करणे राज्यांच्या अख्त्यारित येत असल्याने आपले हात बांधले असून आपण दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही असं केंद्राने न्यायालयात सांगितलं आहे. .यावर दुष्काळामुळे गंभीर समस्या निर्माण झाली असेल आणि लोकांचे हाल होत असतील तरी केंद्र आपण मध्यस्थी न करता काहीच करु शकत नाही असं म्हणू शकते का ? असा सवाल न्यायालयाने केंद्राला विचारला. 
दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नरसिम्हा यांनी न्यायालयात सांगितलं आहे. दुष्काळाला आपत्ती व्यवस्थापन कायद्यात घेतलं गेलं नसलं तरी पिकांच्या नुकसानीअंतर्गत मदत दिली जाऊ शकते असं मत नरसिम्हा यांनी खंडपीठासमोर व्यक्त केलं आहे. न्यायालयाने दुष्काळाचा फटका किती जिल्ह्यांना आणि लोकांना बसला आहे याची माहिती मागवली आहे, तसंच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्तीसाठी किती निधी मंजूर केला जातो याची माहितीदेखील देण्यास सांगितलं आहे. केंद्राने 19 एप्रिलला पुढील सुनावणीदरम्यान सर्व माहिती देण्याचं आश्वासन न्यायालयात दिलं आहे.