शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

डोवाल नव्हे, थंडी संपवेल भारत-चीनमधील तणाव

By admin | Updated: July 16, 2017 16:40 IST

गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले दोन्ही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - गेल्या महिनाभरापासून  भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले  दोन्ही देशांचे लष्कर माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनचा दौरा करणार आहेत. मात्र या परिसरात जोपर्यंत कडाक्याची थंडी पडत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव निवळणार नसल्याचे सुरक्षाविषयक तज्ज्ञांचे मत आहे. तसेच डोवाल यांच्या चीन दौऱ्यातही सीमेवरील तणावाबाबत औपचारिक चर्चा होण्याची शक्यताही तज्ज्ञांना कमीच वाटत आहे.  
इन्स्टिट्युट ऑफ साऊथ अँड साऊथईस्ट एशियन अँड ओशन स्टडीजचे संचालक हू शिशेंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जोपर्यंत भारतीय लष्कर डोकलाममधून माघार घेत नाही तोपर्यंत कोणत्याची प्रकारची चर्चा होणार नाही अशी चीनची भूमिका आहे. या परिस्थितीत चर्चा झाल्यास चीनमधील सर्वसामान्य जनतेची भावना भडकू शकतात."अधिक वाचा (डोकलाम प्रकरण - अजित डोवाल जाणार चीनला)(डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा)(डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ? )"कुठलाही देश माघार घेऊन स्वत:ला पराभूत म्हणून दाखवून देण्यास इच्छूक नसल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर बसून चर्चा करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र येथील हवामान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडी पडत असल्याने त्यावेळी येथे राहणे अशक्य होईल. त्यानंतर दोन्ही सैन्यदले मागे हटू शकतात.  मात्र त्यानंतरही हा तणाव संपण्याची शक्यता कमीच आहे. 
दरम्यान, अजित डोवाल या महिन्याच्या अखेरीस ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी चीनमध्ये जाणार आहेत. डोवाल यांच्या त्या दौऱ्यादरम्यान चीनला चर्चेसाठी तयार करणे कठीण असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न चीनी अधिकाऱ्यांकडून होण्याच्या शक्यता आहे.