शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी लाभ लालफितीतच जी. आर. ची प्रतीक्षा: बागायतीचा कोरडवाहू गोंधळ

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

मिलिंदकुमार साळवे/लोकमत विशेष

मिलिंदकुमार साळवे/लोकमत विशेष
श्रीरामपूर: : सरकारी नियम, आदेश व निकषानुसार ५० पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करून त्यांना त्याप्रमाणे आवश्यक लाभ देण्याची तरतूद असली तरी धरणांच्या लाभक्षेत्रातील गावांना बागायती ठरवून दुष्काळी अनुदान न देण्याच्या निर्णयामुळे श्रीरामपूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील ४३२ गावे दुष्काळग्रस्तांच्या सरकारी लाभापासून वंचित आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील रब्बीच्या एकूण ८४० गावांना फटका बसला असताना केवळ ४०८ गावांमध्येच नजर पैसेवारीच्या आधारे दुष्काळ जाहीर केला. यात पालकमंत्र्यांच्या कर्जत-जामखेडचा समावेश करताना श्रीरामपूरसह इतर ४३२ गावे मात्र वगळली. श्रीरामपूर तालुका हा पूर्णपणे रब्बी पिकांचा तालुका आहे. नजर पैसेवारीत हा तालुका ५० पैशांच्या पैसेवारीत नव्हता. सुधारित व अंतिम पैसेवारीनुसार हा तालुका दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत आला. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय होऊन शासन आदेश निघणे अभिप्रेत असताना दीड महिन्यानंतरही निर्णय होऊन आदेश न निघाल्याने ५० पैशांच्या पैसेवारी येऊनही श्रीरामपूर दुष्काळग्रस्तांच्या सवलतींपासून वंचित राहून तालुक्यावर अन्याय झाला आहे.
सन २०१५-१६ च्या खरीप हंगामाबाबत नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी २४ फेब्रुवारी २०१६ च्या पत्रानुसार मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले होते. महसूल खात्याच्या पूर्वीच्या आदेशांमध्ये ५० पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू करण्याचे स्पष्ट म्हटले असले तरी या खात्याचे उपसचिव अशोक अत्राम यांनी २२ मार्च २०१६ ला राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून धरणाच्या लाभक्षेत्रातील बागायती गावांना दुष्काळी अनुदान देता येणार नाही, असे कळवून गोंधळ उडवून दिला आहे.
------स्पष्टतेचा दुष्काळ----
धरणाखालील लाभक्षेत्रातील लाभार्थ्यांना, शेतकर्‍यांना दुष्काळाची मदत अभिप्रेत नाही. ३१ डिसेंबर २०१५ चा शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत खरीप हंगामातील बागायती पिकांची कापणी पूर्ण झाली असली तरी, स्थानिक चौकशीद्वारे विहिरींमध्ये पाणी आहे, किंवा नाही, कोणती पिके घेतली, त्यानुसार किती उत्पादन झाले, याची शहानिश करून विहिरीचा जीपीएस फोटो घेऊन त्याआधारे निर्णय घेता येईल. ज्या प्रकरणात स्थानिक चौकशीद्वारे निर्णय घेणे शक्य होणार नाही, अशा प्रकरणात कोरडवाहू पीक गृहित धरुन नियमानुसार, निकषानुसार मदत वाटप करावे, असे उपसचिव अशोक अत्राम यांनी म्हटले आहे. सुरुवातीस बागायती पिकांना मदत अभिप्रेत नाही, असे म्हणणार्‍या याच पत्राच्या शेवटी मात्र कोरडवाहू पीक गृहित धरुन मदत वाटप करावे, असेही म्हटल्याने या पत्रात शब्दांचा गोंधळ उडून स्पष्टतेचा दुष्काळ उघड झाला आहे.
----महसूलमंत्र्यांना निवेदन-----
या अन्यायाबाबत महसूलमंत्री खडसे यांना नगरमधील बैठकीत निवेदन देऊन त्यांचे या अन्यायाकडे लक्ष वेधले आहे.
भाऊसाहेब कांबळे, आमदार, श्रीरामपूर.