शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

बारामती तालुक्यात दुष्काळी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

स्थितीमुळे टँकरची मागणी वाढली

स्थितीमुळे टँकरची मागणी वाढली
मोरगाव :
श्रावण महिना म्हटले की सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. मात्र, बारामती तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रावणाचा मागमूसही लागत नाही. जनावरांना चारा, पिण्याचे पाणी, टँकर मागणी यामुळे तालुक्यात सर्वत्र दुष्काळजन्य स्थिती आहे.
तालुक्याच्या जिरायती भागातील १६ गावांमध्ये दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. मोरगाव प्रादेशिक नळ योजनेच्ेा पाणी शेवाळ व गढूळयुक्त येत आहे. यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. जिरायती भागातील मोरगाव, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, लोणी भापकर, माळवाडी या गावांमध्ये दुष्काळीस्थिती आहे. मोरगाव येथील गावठाणासह गव्हाळवस्ती, सोनार शेत येथे टँकरची मागणी असल्याचे ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी सांगितले. जोगवडी येथील खोमणेवस्ती, भोसलेवस्ती, मुकादमवस्ती येथे एक टँकरची मागणी ग्रामसेवक सोमनाथ थोरात यांनी केली आहे. तसेच, तरडोली येथे मे महिन्यापासून टँकर सुरू आहे. मात्र, हे पाणी अपुरे पडत असल्याने वाढीव टँकरची मागणी असल्याचे ग्रामविकास अधिकारी साळुंखे यांनी सांगितले. तसेच, मुर्टी येथे भीषण पााणीटंचाई असल्याचे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब नलवडे यांनी सांगितले आहे. लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील राजपुरे मळा, चिरेखान वस्तीसह गावठाणाला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे जिरायती भागातील जनता पाऊस व पाण्याअभावी भर श्रावणात पाणी... पाणी... करत आहेत.
——————————————————————