शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेज सफाईत भ्रष्टाचार स्थायी सभा: अभिप्रायासाठी एकमताने विषय फेरसादर

By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST

सोलापूर : ड्रेनेज सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्यावर प्रशासनाने संबंधित अधिकार्‍याकडेच चौकशी देऊन प्रकरण स्थायी समितीकडे फेरसादर केले आहे. रुपाभवानी नाला ते विर्शांती चौक अशा 1493 मीटर ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झालेले नसताना सफाई झाल्याचे दाखवून बिल उचललेच कसे, अशी उपसूचना सुरेश पाटील यांनी मांडल्यावर चर्चेअंती हा विषय एकमताने फेरसादर करण्यात आला.

सोलापूर : ड्रेनेज सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्यावर प्रशासनाने संबंधित अधिकार्‍याकडेच चौकशी देऊन प्रकरण स्थायी समितीकडे फेरसादर केले आहे. रुपाभवानी नाला ते विर्शांती चौक अशा 1493 मीटर ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झालेले नसताना सफाई झाल्याचे दाखवून बिल उचललेच कसे, अशी उपसूचना सुरेश पाटील यांनी मांडल्यावर चर्चेअंती हा विषय एकमताने फेरसादर करण्यात आला.
स्थायी समितीची सभा सभापती पद्माकर काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. सभेत 9 जानेवारीच्या सभेने परत पाठविलेला मुख्य ड्रेनेजलाईन साफसफाईच्या निविदेचा विषय प्रशासनाने फेरसादर केला होता. यावर उपसूचनेद्वारे सुरेश पाटील यांनी लक्ष वेधले. शहरातील 18 हजार मीटर ड्रेनेजलाईन सफाईचा मक्ता कोटा यांना देण्यात आला होता. 11 हजार 757 मीटरचे काम ठेकेदाराने केले. उर्वरित 6243 मीटरचे काम न करताच अधिकार्‍यांशी संगनमत करून रकमा उचलल्या. निविदा 77 लाख 62 हजारांची असताना 43 टक्के जादा दराने म्हणजे 1 कोटी 10 लाखाला ठेका मंजूर केला व केलेल्या कामापोटी 62 लाख 89 हजार ठेकेदाराला अदा केले. या विषयाकडे 9 जानेवारीच्या सभेत लक्ष वेधल्यावर फेरचौकशीत संबंधित अधिकार्‍यांनी मक्त्याच्या रकमेत 48 लाख 11 हजारांची बचत झाल्याचे नमूद केले आहे. बचत कोणत्या आधारे झाली याचा खुलासा संबंधित अधिकार्‍यांनी केलेला नाही. मागील सभेत विषय फेरसादर झाल्यावर सहायक आयुक्त अमिता दगडे?पाटील यांनी प्रकरण चौकशीसाठी गडबड केलेल्या अधिकार्‍यांकडेच दिले. दुलंगे व चलवादी दोषी असताना चुकीचा अहवाल सभेकडे पाठविला. त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असून, संबंधित रक्कम अधिकार्‍यांच्या वेतनातून वसूल करावी व त्यांच्यावर कारवाई करावी व प्रकरण संपूर्ण अभिप्रायासह फेरसादर करावे अशी उपसूचना मांडली.
हुतात्मा स्मृती मंदिर नूतनीकरणाच्या उद्घाटन खर्चास बहुमताने मंजुरी देण्यात आली. कार्यक्रमाला 6 पाहुणे आलेले असताना 22 शालींची खरेदी झाली. आलेल्या पाहुण्यांचा निवास, जेवण आणि फिरण्यासाठी मोठा खर्च दाखविण्यात आला. पत्रिका व सभागृहातील डिजिटल फलकास 40 हजारांचा खर्च दाखविण्यात आला. हा खर्च कोणत्या नियमानुसार केला व यात महापालिकेचे हित न पाहणार्‍या संबंधितांवर योग्य ती कारवाई करून प्रकरण फेरसादर करावे, अशी उपसूचना पाटील यांनी मांडली. जीआयएस प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअर खरेदीवर गरमागरम चर्चा झाली.