शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. विजय दर्डा यांना मोहन बाबू विद्यापीठाकडून डी. लिट. पदवी प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:48 IST

सामाजिक उत्तरदायित्व, निर्भीड पत्रकारितेचा वसा जपण्यासाठी तसेच प्रसारमाध्यम उद्योगाच्या प्रगतीसाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची या विद्यापीठाने प्रशंसा केली. या समारंभाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे माजी मंत्री व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. दर्डा यांचे प्रतिपादन

तिरूपती : लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांना मोहन बाबू विद्यापीठाने (एमबीयू) सन्माननीय डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट) ही पदवी शनिवारी प्रदान केली. पत्रकारिता, प्रसारमाध्यम स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाहीविषयक सुधारणा या क्षेत्रांमध्ये डॉ. दर्डा यांच्या अनमोल योगदानाचा विद्यापीठाने अशा समारंभाद्वारे गौरव केला. सामाजिक उत्तरदायित्व, निर्भीड पत्रकारितेचा वसा जपण्यासाठी तसेच प्रसारमाध्यम उद्योगाच्या प्रगतीसाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची या विद्यापीठाने प्रशंसा केली.या समारंभाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे माजी मंत्री व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मोहन बाबू विद्यापीठाचे कुलपती आणि श्री विद्यानिकेतन एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मोहन बाबू, जागतिक कीर्तीचे तालवादक पद्मश्री शिवमणी, विद्यापीठाचे प्र-कुलपती विष्णू मांचू, विश्व हिंदी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मभूषण प्रा. यार्लगड्डा लक्ष्मीप्रसाद, एसव्हीईटीचे कार्यकारी संचालक विनय महेश्वरी, श्री विद्यानिकेतन एज्युकेशनल ट्रस्टच्या सदस्य विरानिका मांचू व विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि विद्यार्थी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

डॉ. दर्डा यांनी मोहन बाबू विद्यापीठाने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि हा गौरव लोकमत मीडिया ग्रुपने जोपासलेली निर्भीड पत्रकारितेची परंपरा आणि संस्थापक जवाहरलाल दर्डा यांना अर्पण केला. 

डॉ. दर्डा म्हणाले की, जग प्रचंड वेगाने बदलत आहे आणि यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे मुख्य कारण आहे. याचा समाजावर होणारा परिणाम प्रचंड असून, तो यापुढे अधिक वेगाने वाढणार आहे. एआयला कोणीही घाबरू नये, तर त्याचा स्वीकार करावा व आपापल्या क्षेत्रात त्याचा उपयोग करण्यास शिकावे. एआय माणसांची जागा घेईल का, हे निश्चित सांगता येत नाही; पण जी माणसे एआय समजून घेतील, ती एआय न उमगलेल्या माणसांची जागा घेतील. 

डॉ. विजय दर्डा यांचा यापूर्वी दोनदा डी. लिट.ने सन्मानडॉ. विजय दर्डा यांना यापूर्वीही डी. वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) आणि रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटी (अमेरिका) यांच्याकडून पत्रकारिता आणि माध्यम उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी सन्माननीय डी. लिट. पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाuniversityविद्यापीठ