शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांचे श्रेय दाबण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

सुखदेव थोरात : जल, सिंचन, उर्जा क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान

सुखदेव थोरात : जल, सिंचन, उर्जा क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच देशाचे जल, सिंचन आणि उर्जा धोरण तयार केले. मात्र, त्यांचे श्रेय दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय जल आणि उर्जा दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी शनिवारी पुण्यात केली.
डेक्कन कॉलेजच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासावर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या १८व्या राज्यस्तरीय द्विवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी थोरात बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे, आमदार जगदीश मुळीक, संगीता ठोंबरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघाचे अध्यक्ष अरुण भालेराव, कार्याध्यक्ष अशोक सोनवणे, किशोर अहिवळे, संजय घोडके, जे. एस. पाटील, राजू गायकवाड, सुधाकर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, 'डॉ. आंबेडकर यांनी दलितांच्या उत्थानासाठी केलेले कार्य सर्वांना माहित आहे. त्यांनी जल, सिंचन आणि उर्जा क्षेत्रातही भरीव काम केले आहे. या क्षेत्रांच्या नियोजनात त्यांनी मूलभूत भूमिका बजावली. '
थोरात म्हणाले, 'आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळेच खासगी क्षेत्रामध्ये समावेश असलेल्या विद्युत विभागाचा समावेश सरकारी क्षेत्रामध्ये झाला. वीज आणि पाणी हे उद्योगांसाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना ते सहज उपलब्ध व्हायला हवे. मात्र, उद्योगांचा फायदा तळागाळातील लोकांना व्हावा, याकडे उद्योगक्षेत्राने लक्ष द्यायला हवे, अशी भूमिका आंबेडकरांची होती,'
पठारे म्हणाले, ' मागील २५ वर्षांत मध्यमवर्गाच्या विचारसरणीत कमालीचा फरक पडला आहे. मध्यमवर्गीय समाज हा फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतो आणि कृती मात्र, अगदी या महापुरुषांच्या विचारांच्या विरुद्ध करतो. मी, माझा, मला हा व्यक्तीवाद मध्यमवर्गात प्रचंड फोफावला आहे. ही स्वकेंद्रित वृत्ती आधुनिक काळातील सर्वांत मोठी शोकांतिका म्हणायला हवी. मध्यमवर्गाला तळागाळातील वर्गाबद्दल आस्था उरलेली नाही. असेच चालले तर पुढच्या पिढीला समाज, देशाबद्दल प्रेम वाटणार नाही. येत्या १० वर्षांत ही परिस्थिती उद्भवू शकते. '
संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जारोंडे यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)
.............जोड आहे...............