शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी अंत्यसंस्कार

By admin | Updated: July 28, 2015 16:31 IST

भारताचे मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे पार्थिव दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - भारताचे मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल झाले असून यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. 
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास डॉ. कलाम यांचे पार्थिव घेऊन येणारे वायुदलाचे विशेष विमान पालम विमानतळावर पोहोचले. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी कलाम यांना पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांनी डॉ. कलाम यांना मानवंदना दिली. 
सोमवारी सायंकाळी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ८४ वर्षीय कलाम ६.३० च्या दरम्यान  अचानक घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. 
आज सकाळी कलाम यांचे पार्थिव शिलाँगहून गुवाहाटी येथे आणण्यात आले. तेथे आसामाचे मुख्यमंत्री तरूम गोगोई यांनी पुष्पचक्र अर्पण करून कलाम यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव विशेष विमानाने राजधानी दिल्लीत नेण्यात आले. तेव्हा प्रोटोकॉल मोडून राष्ट्रपती व पंतप्रधान विमानतळावर उपस्थित होते.  त्यानंतर डॉ. कलाम यांचे पार्थिव १०, राजाजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.  कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैरोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम येथील त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. 
कलाम यांच्या निधनानंतर शासनातर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोणतीही सुट्टी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेजेस व सरकारी कार्यालये सुरू राहणार असल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
संसदेत माजी राष्ट्रपतींना वाहिली श्रद्धांजली...
दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात आज डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कलाम यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली तर राज्यसभेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दोन दिवसांसाठी व राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.