शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांना राष्ट्राचे अभिवादन

By admin | Updated: April 15, 2016 04:10 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात गुरुवारी देशभर साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर हे आधुनिक

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात गुरुवारी देशभर साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील महान आदर्श आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. संसद भवन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महू या बाबासाहेबांच्या जन्मस्थळी भेट देऊन महामानवाला आदरांजली अर्पण केली. महू येथे २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या भव्य स्मारकाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, असे डॉ. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू आर.एस. कुरील यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि अन्य नेते महू येथे उपस्थित झाले होते. मोदींनी तेथील भव्य स्मारकाचे दर्शन घेतले.नवी दिल्लीतील संसद भवनात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वात संसद सदस्यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांच्या तैलचित्राला आदरांजली अर्पण करणाऱ्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, एम. वेंकय्या नायडू, थावरचंद गहलोद व काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा समावेश होता. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, नवी दिल्लीसह देशातील अनेक राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)बाबासाहेब महान आदर्श-सोनिया गांधीकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बाबासाहेबांना आधुनिक भारताचे महान आदर्श संबोधून राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. ‘बाबासाहेबांचा लोकशाहीवर अढळ विश्वास होता. राज्यघटनेने आपल्याला केवळ राजकीय लोकशाहीच दिलेली नाही तर सामाजिक लोकशाहीदेखील दिली आहे आणि सर्वांसाठी समानतेची हमी तसेच दुर्बल व वंचित घटकांना सबलीकरणाची संधी दिली आहे. बाबासाहेबांनी तयार केलेली राज्यघटना ही मूलभूत मानव अधिकारांची हमी देणारी आहे,’ असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.