शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी इस्पितळात काम करण्यास डॉक्टर अनुत्सुक उपमुख्यमंत्री : सुकुर येथे उपआरोग्य केंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

पर्वरी : डॉक्टरांची अनुपलब्धतेमुळे सरकारला प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रे चालविणे कठीण जाते. गोव्यामध्ये डॉक्टर सरकारी इस्पितळात काम करण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे नागरिकांना समाधानकारक सेवा देणे अडचणीचे ठरते, असे उद्गार उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांनी सुकुर येथे काढले. सुकुर पंचायत घरात आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

पर्वरी : डॉक्टरांची अनुपलब्धतेमुळे सरकारला प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रे चालविणे कठीण जाते. गोव्यामध्ये डॉक्टर सरकारी इस्पितळात काम करण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे नागरिकांना समाधानकारक सेवा देणे अडचणीचे ठरते, असे उद्गार उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री फ्रांसिस डिसोझा यांनी सुकुर येथे काढले. सुकुर पंचायत घरात आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, की हल्लीच आरोग्य खात्याने ५० डॉक्टरांची नेमणूक करण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु त्यास प्रतिसाद मिळावा तितका मिळाला नाही फक्त १५ डॉक्टरांनी अर्ज केला. अशी परिस्थती राहिली तर सरकारला ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रे चालविणे कठीण जाईल, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आमदार रोहन खंवटे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की पर्वरी मतदारसंघात आरोग्य उपकेंद्रांची आवश्यकता होती. सरकारला विनंती केल्यानुसार त्वरित आपली मागणी पूर्ण झाली. सुकुर पंचायतीची लोकसंख्या ९५०० वर आहे आणि या भागात आरोगय उपकेंद्राची नितांत गरज होती. सुकुरला आरोग्य उपकेंद्र उघडून सरकारने येथील ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली याचेच समाधान वाटते. सरकारने पर्वरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला हिरवा कंदील दाखविला आहे आणि जागाही निश्चित केली आहे. सरकारने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलून प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करावी, अशी विनंती खंवटे यांनी यावेळी आरोग्यमंत्र्यांपाशी केली आहे.
यावेळी सुकुर पंचायतीच्या सरपंच सोनिया पेडणेकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी, हळदोणे आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी मारिया सिकेरा आणि पंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मारिया सिकेरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. रोशन नाझारेथ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
सुकुर आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा, सोबत आमदार रोहन खंवटे, सरपंच सोनिया पेडणेकर व इतर मान्यवर. (छाया : शेखर वायंगणकर)