देवळा बसस्थानकासमोर घाणीचे साम्राज्य, आरोग्य धोक्यात
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
देवळा : देवळा स्थानकासमोर असलेल्या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार बसस्थानक परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली असून, तशा आशयाचे निवेदन देवळा ग्रामपालिकेला देण्यात आले आहे.
देवळा बसस्थानकासमोर घाणीचे साम्राज्य, आरोग्य धोक्यात
देवळा : देवळा स्थानकासमोर असलेल्या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार बसस्थानक परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली असून, तशा आशयाचे निवेदन देवळा ग्रामपालिकेला देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, देवळा बसस्थानकासमोर असलेल्या विश्वसिंधू कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पुढील गाळ्यात रसवंतीगृह सुरू आहे. अनेक वर्षांपासून हे रसवंतीगृह या ठिकाणी सुरू असून, त्याचा परिसरातील दुकानदार नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रसवंतीगृहाच्या बाहेरील बाजूस रस गाळणी मशीन रस्त्यावर सुरू असून, उसाचा रस काढल्यानंतर राहिलेल्या चोथ्यावर माशा बसतात. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळते. तसेच घाण पाणी रस्त्यावर फेकून दिले जाते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. सद्या साथीचे रोग सर्वत्र सुरू आहेत. रसवंतीगृहाच्या अस्वच्छतेमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, हे रसवंतीगृह इतरत्र हलवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती देवळा तहसीलदार देवळा पोलीस ठाणे आदिंना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर वैभव भामरे, दीपक अहेर, किरण शेवाळे, सुभाष सोनवणे, हंसराज देवरे, उद्धव भामरे, विश्वास देवरे, मोहमद अनसारी, गजराज वैष्णव, गंगाधर निकम आदिंच्या स्वाक्षर्या आहेत. (वार्ताहर)