शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प इफेक्ट: हाफीजच्या संघटनेवर बंदी

By admin | Updated: July 1, 2017 01:15 IST

मुंबईवरील २६/११च्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या ‘तेहरिक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुंबईवरील २६/११च्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या ‘तेहरिक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. अमेरिकेने अलीकडेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सज्जड इशारा देत पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांची पाळेमुळे उद्ध्वस्त करण्याचे, आर्थिक मदत रोखण्याचे तसेच बिगर नाटो मित्र राष्ट्राचा दर्जा रद्द करण्याचेही संकेत दिले होते. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानला अखेर हाफीज सईदच्या या संघटनेवर बंदी घालणे भाग पडले. हाफीज सईदला पाकिस्तानने ३० जानेवारीपासून नजरकैद केले आहे. अमेरिकेने २००१मध्ये लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतर पाकिस्तानने २००२मध्ये लष्कर-ए-तैयबावर बंदी घातली होती. त्यानंतर हाफीज सईदने जमात-उद-दावा ही संघटना स्थापन करून भारतविरोधी कारवाया चालू ठेवल्या. या संघटनेवर पाकिस्तान नजर ठेवून असल्याने त्याने ‘तेहरिक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ ही संघटना स्थापन करून दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या. पाकिस्तानच्या दहशतवादीविरोधी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या वेबसाईटनुसार, जमात-उद-दावा या संघटनेचा पाकिस्तानने बंदी असलेल्या संघटनांच्या यादीत समावेश करून या संघटनेवर नजर ठेवून आहे.१० दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ड्रोनने हल्ला करण्याचे संकेत दिले होते. बंदी असलेल्या संघटनेच्या यादीत जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा, तेहरीक-ए-तालिबान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह ६४ संघटनांचा समावेश आहे.भारताने उपस्थित केला होता मुद्दा-भारताने ‘तेहरीक-ए-आझादी-जम्मू-काश्मीर’ या संघटनेच्या दहशतवादी कारवायांकडे आंतरराष्ट्रीय दहशतवाद वित्तीय कृती दलाचे लक्ष वेधत या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. भारताच्या मागणीनुसार पहिल्यादांच पाकिस्तानने या संघटनेवर बंदी घातली आहे. दहशतवादाच्या दृष्टीने अत्यंत जोखमीच्या आणि सहकार्य न करणाऱ्या क्षेत्राबाबत इंटर-गव्हर्मेन्टल फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स पुढच्या महिन्यात फेरआढावा घेणार आहे. त्याआधीच पाकिस्तानने हे पाऊल उचलत दहशतवादाच्या मुद्द्यावर सहकार्य करीत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. मनी लाँड्रिंग, दहशतवाद्यांचे आर्थिक पाठबळ आणि अन्य संभाव्य धोक्यांना पायबंद करण्यासाठी कायदेशीर, नियंत्रण आणि कार्यवाहीत्मक उपायांच्या अंमलबजावणीसाठी या अ‍ॅक्शन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.