शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत लोकल घसरली मध्य रेल्वे विस्कळीत: वाहतुकीवर परिणाम

By admin | Updated: July 19, 2015 21:22 IST

डोंबिवली : डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान गणेश मंदिर ब्रीजजवळ सीएसटी- कल्याण डाऊन धीम्या लोकलचा पुढून तिसरा डबा घसरल्याची घटना रविवारी स. ११.१० च्या सुमारास घडली. यामुळे डाऊन धीमा मार्ग ठप्प, तर अप स्लो आणि अप/डाऊन जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. त्या मार्गांवरील रेल्वे वाहतूक दिवसभर २०/२५ मिनिटे विलंबाने धावत होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

डोंबिवली : डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान गणेश मंदिर ब्रीजजवळ सीएसटी- कल्याण डाऊन धीम्या लोकलचा पुढून तिसरा डबा घसरल्याची घटना रविवारी स. ११.१० च्या सुमारास घडली. यामुळे डाऊन धीमा मार्ग ठप्प, तर अप स्लो आणि अप/डाऊन जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. त्या मार्गांवरील रेल्वे वाहतूक दिवसभर २०/२५ मिनिटे विलंबाने धावत होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
डाऊन स्लोच्या प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी दिवा स्थानकातून लोकल डाऊन जलदवर वळविण्यात आल्या. परिणामी, कोपर व ठाकुर्ली स्थानकांत डाऊनवर लोकल सेवा उपलब्ध नव्हती. डाऊनवर घटना घडल्याने अप मार्गावरील लोकल काही वेळ बंद होती. त्यामुळे डोंबिवली ते कल्याण डाऊनहून आणि दिवा ते डोंबिवली अप मार्गाहून प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमधून अपेक्षित ठिकाणी जाण्याचा पर्याय निवडला. एकीकडे लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या लांबचलांब रांगा आणि त्यातून मार्ग काढत शेकडो प्रवासी असे विचित्र दृश्य दिवा ते कल्याण मार्गावरील रेल्वे ट्रॅकमध्ये पाहायला मिळाले.
घटनास्थळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा, ओएसडी राजीव त्यागी, रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय आयुक्त अलोक बोहरा, डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. श्रीवास्तव, दीक्षित आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दुपारी सव्वातीन-साडेतीनच्या सुमारास बाधित लोकलचा डबा ट्रॅकवर आणण्यात रेल्वेच्या गँगमन, ओएचई तसेच अभियांत्रिकी आणि विद्युत कर्मचार्‍यांना यश आले. सर्वात आधी ती लोकल पुढे नेण्यात आली. त्यानंतर, साधारणत: दीड-दोन तास या मार्गावरील ट्रॅकचे, ओएचईचे आणि सिग्नल यंत्रणेचे काम सुरू होते. ही घटना कशामुळे घडली, याबाबतची माहिती मिळू शकली नसली तरीही तिची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले. संध्याकाळी ५ च्या सुमारास लोकल सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला होता. * ठाकुर्ली स्थानकात घटना घडल्यापासून दु. १२-१ पर्यंत लोकल न धावल्याने डाऊनच्या प्रवाशांनी थेट डाऊन जलदची लोकल थांबवत त्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ ठाकुर्ली स्थानकात तणावाचे वातावरण होते. त्यातच गाड्या नसल्याने अनेकांनी डोंबिवली स्थानक गाठण्यासाठी मिळेल त्यामार्गे जाण्याचा प्रयत्न केला.

फोटो : आनंद मोरे