कसबे सुकेणे : गेल्या काही दिवसांपासून कसबे सुकेणे शहरात मोकाट कुत्रे सैराट झाले असून, या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कसबे सुकेणे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद केला आहे. त्यामुळे आबालवृद्ध आणि नागरिकांत या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. नाशिक मधून तडीपार झालेली कुत्रे सद्य नाशिक लगतच्या ग्रामीण भागात मोठी दहशत माजवीत आहे. ओझर , दिक्षी, सुकेणे या भागात या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून बर्याच ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला चढविला आहे. तर दुचाकी स्वारही या कुत्र्यांमुळे रस्त्यावर घसरत असून जखमी होत आहे. नाशिक महापालीकेने पकडलेली कुत्रे या भागात सोडू नये तसेच सोडलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपचे सुदाम जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे- ( वार्ताहर)ग्रामपालिका हतबल आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामपंचायतीना कर्मचार्यांचे वेतन करणेही कठीण झाले आहे - त्यामुळे कुत्रे पकडण्याची व्यवस्था ग्रामपालिकांना उपलब्ध करणे दुरापास्तच , म्हणून शासनाने तालुका पातळीवर अश्या डॉग स्कॉड सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आह प्रतिक्रीया- गेल्या आठवड्यापासून कसबे सुकेणेत मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. त्यामुळे नागरिकांत मोठी दहशत आहे- या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. - सुदाम जाधव, कसबे सुकेणे
कसबे सुकेणेत कुत्रे झाली सैराट
By admin | Updated: June 23, 2016 00:10 IST