शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या विचारसरणीचे समर्थन करत नाही - अझीम प्रेमजी

By admin | Updated: April 6, 2015 11:22 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो म्हणजे मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करतो असे नाही, असे विप्रो ग्रुपचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो म्हणजे मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करतो असे नाही, असे विप्रो ग्रुपचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केले. रविवारी दिल्लीत संघाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय सेवा भारती' या कार्यक्रमात अझीम प्रेमजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने बरीच खळबळ माजली होती. प्रेमजी यांना संघ विचारसरणी मान्य असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली होती. मात्र अझीम प्रेमजी यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
'सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्थांना पाठबळ मिळावे म्हणून मी त्या कार्यक्रमास उपस्थित होतो, मात्र त्याचा वेगळा अर्थ लावला गेला. संघाच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत आहात म्हणजे तुम्हाला संघाची विचारसरणी मान्य आहे, असे काही जण मला म्हणत होते. पण फक्त एखाद्या व्यासपीठावरून बोलण्यामुळे, तेथे हजर राहिल्यामुळे तुम्हाला त्या व्यासपीठावर मांडण्यात आलेले सर्व विचार मान्य आहेत असे होत नाही. मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करत नाही, ' असे प्रेमजी यानी स्पष्ट केले.