शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह झालेली "रूपा" होणार डॉक्टर

By admin | Updated: July 1, 2017 15:30 IST

वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालेली रूपा यादव ही वीस वर्षीय तरूणी लवकरच राजस्थानमध्ये डॉक्टर होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

जयपूर, दि. 1- वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालेली रूपा यादव ही वीस वर्षीय तरूणी लवकरच राजस्थानमध्ये डॉक्टर होणार आहे. सासरच्या मंडळींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आता वैद्यकीय शिक्षणाची ‘नीट’  ही प्रवेश परीक्षा रूपाने पास केली असून ती डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहाते आहे. लग्नानंतरही रूपाने शिक्षण घेणं सुरू ठेवलं आहे. कोटामधील एका शिक्षण संस्थेतून तिने नीटसाठी अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात रूपाला नीटची परीक्षा पास करण्यात यश आलं आहे. तिने वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत 603 गुण मिळविले आहेत. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
पाच भावंडांमध्ये रूपा सर्वात लहान आहेत. रुपाचं तिच्या मोठ्या बहीणीच्या लग्नातच लग्न लावून देण्यात आलं होतं. तिसरीत शिकत असताना तिचं लग्न झालं.  तिच्या लग्नाच्या वेळी तिचा पती शंकरलाल १२ वर्षांचा होता. लग्नानंतर रूपाला तिच्या दिराने पाठिंबा दिल्याने तिने शिक्षण सुरु ठेवलं. 
"दहावीत मला ८४ टक्के गुण मिळाल्यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिने शिक्षण सुरुच ठेवावं, असा आग्रह धरला होता. त्याला सासरच्यांनीही त्याला मान्यता दिल्याने मी पुढचं शिक्षण घेतलं, असं रूपा यादवने द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला सांगितलं आहे. 
 
गावापासून ६ किलोमीटर लांब असणाऱ्या कॉलेजमध्ये रूपाने दहावीनंतरच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता. अभ्यास आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत तिने अकरावी आणि बारावीची परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवलं. रूपाला अकरावीत 81 टक्के तर बारावीच्या परीक्षेत 84 टक्के मिळाले.  रूपाचे काका भीमराव यादव यांचं अचानक ह्रदय रोगाचा झटका आला होता आणि त्यावेळी त्यांना योग्य मेडिकल सुविधा न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच रूपाने डॉक्टर व्हायचा निर्धार केला होता. या निर्धारानुसारच तिने डॉक्टर होण्यासाठी मेहनत सुरू केली. रूपाला कोटामध्ये परीक्षेची तयारी करायची होती पण घरच्या आर्थिक अडचणींमुळे तिला बाहेर शिक्षण घेणं शक्य नव्हतं. यावेळी रूपामध्ये असणाऱ्या शिकण्याच्या जिद्दीने अलेन कोचिंग इन्स्टीट्यूटने एका फीच्या रकमेच्या काही टक्के शिष्यवृत्ती दिली, तसंच कॉलेजच्या वसतिगृहात तिची राहण्याचीही व्यवस्था केली.
 
"माझ्या सासरच्या लोकांनी मला नेहमीची ते माझे आई-वडील असल्यासारखी वागणूक दिली आणि शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन दिलं. पण आमच्या कुटुंबाचा शेती व्यवसाय असल्याने त्यातून फारसं उत्पन्न येत नव्हतं. त्यामुळे माझ्या पतीने माझ्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी टॅक्सी चालवायला सुरूवात केली, असं रूपाने सांगितलं आहे. 
 
अलेन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सध्या रुपा एमबीबीएसचे शिक्षण घेते आहे.