शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेवर संघाचा विश्वास आहे काय?

By admin | Updated: January 13, 2016 04:06 IST

राज्यघटना व राष्ट्रध्वजावर रा. स्व. संघाचा विश्वास आहे काय, असा सवाल दारुल-उलूम- देवबंद या इस्लामिक संस्थेने केला आहे. गणराज्यदिनी मदरशांच्या परिसरात तिरंगा फडकविण्याचे

लखनौ : राज्यघटना व राष्ट्रध्वजावर रा. स्व. संघाचा विश्वास आहे काय, असा सवाल दारुल-उलूम- देवबंद या इस्लामिक संस्थेने केला आहे. गणराज्यदिनी मदरशांच्या परिसरात तिरंगा फडकविण्याचे आवाहन संघप्रणीत मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केल्यानंतर उफाळलेल्या वादात आता दारुल-उलूमने उडी घेतली आहे. मदरशांच्या देशभक्तीबाबत आम्ही कधीही शंका उपस्थित केलेली नाही, असा खुलासा एमआरएमने केला असला तरी त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तिरंगा फडकविण्याचा निर्णय हा मदरशांचा वैयक्तिक पसंतीचा मुद्दा ठरतो. बहुतांश मदरसे स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिन साजरे करतात. ध्वजारोहणही केले जाते, असे दारुल-उलूमचे प्रसिद्धी सचिव अशरफ उस्मानी यांनी स्पष्ट केले. मदरशांनी स्वातंत्र्यलढ्यात भूमिका बजावली होती. याउलट देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात संघाचे योगदान काय, असा सवालही उस्मानी यांनी केला. संघ केवळ भगव्या झेंड्याची पूजा करतो. संघाने सर्वप्रथम आपले मुख्यालय व अन्य कार्यालयांवर तिरंगा फडकवावा. त्यानंतरच मदरशांबाबत बोलावे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)मुस्लिम राष्ट्रीय मंचचा खुलासा१ मदरशांच्या देशभक्तीबाबत शंका उपस्थित करण्याचा या मोहिमेमागे उद्देश नाही. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही गणराज्यदिन आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करीत आहोत, असे स्पष्टीकरण मुस्लीम राष्ट्रीय मंचचे (एमआरएम) राष्ट्रीय निमंत्रक मोहंमद अफजल यांनी स्पष्ट केले. २ मदरशांच्या देशभक्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही. सर्व नागरिकांनी महत्त्वाच्या राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी तिरंगा फडकवायला हवा. एमआरएमचे कार्यकर्ते मदरशांवर ध्वजारोहण करतील. एक मुस्लिम म्हणून आम्ही मदरशांबाबत बोलत आहोत. ३ मुस्लिम मातृभूमीवर प्रेम करतात, तिरंग्याला सलाम करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे आम्ही या मोहिमेला व्यापक स्वरूप देत आहोत.