शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

सरदारजींवर जोक्स करायचे की नाही?

By admin | Updated: October 30, 2015 22:02 IST

लोकांना हसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये शीख समुदायाला लक्ष्य बनविण्यात येत असल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल करून घेतली.

नवी दिल्ली : लोकांना हसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये शीख समुदायाला लक्ष्य बनविण्यात येत असल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी शुक्रवारी दाखल करून घेतली.महिला वकील हरविंदर चौधरी यांनी ही जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, शीख समुदाय हा आपल्या निखळ विनोदबुद्धीसाठी ओळखला जातो आणि ते सुद्धा या विनोदाचा आनंद लुटत असतात. आपण खुशवंतसिंग यांचे विनोद ऐकले असतील. हा केवळ एक मनोरंजनाचा भाग असून आपण त्यावर बंदी का आणू इच्छिता? बहुतांश विनोदांमध्ये शीख समुदायाच्या लोकांना मूर्ख अथवा कमी बुद्धी असल्याचे दर्शविण्यात येत असून हा प्रकार अनुचित आहे, अशी भावना याचिकाकर्त्याने व्यक्त केली असून असे विनोद प्रकाशित करणाऱ्या ५००० वर वेबसाईटस्वर निर्बंध अथवा वेबफिल्टर लावण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. सरदारांवरील विनोदांमुळे आमच्या मुलांना अपमान आणि लाज वाटते, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.पंतप्रधानांनी बिहारी लोक बुद्धिमान असतात असे म्हटले होते. यावरून इतर समुदाय बुद्धिमान नाही, असे संकेत मिळतात, असे याचिकाकर्त्या म्हणाल्या. यावर चिंता करू नका आम्ही पंजाबला जाऊ तेव्हा तेथे शीख बुद्धिमान असतात असे सांगू,अशी टिप्पणी पीठाने केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)