शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मत द्या किंवा देऊ नका, जीएसटीत बदल नाही

By admin | Updated: July 8, 2017 03:14 IST

‘वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यात पंतप्रधानही बदल करू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या हातात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यात पंतप्रधानही बदल करू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या हातात काहीही नसून, केवळ जीएसटी काऊन्सिललाच ते अधिकार आहेत. त्यामुळे आंदोलन, संप करा, आम्हाला निवडणुकीत मत द्या अथवा नका देऊ, जीएसटीमध्ये बदल करता येणार नाही,’ असे केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन (जितो)च्या वतीने ‘जीएसटी नंतर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, ज्येष्ठ उद्योजक रसिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल, कृष्णकुमार गोयल, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड. हितेश जैन, जितोचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव नरेंद्र छाजेड, विजयकांत कोठारी यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गोयल म्हणाले, ‘कोणताही बदल सहज होत नाही. करप्रणालीत बदल होत असताना काही काळ अडचणींचा सामना करावा लागेल. देशाची सद्य:स्थिती पाहून सर्वपक्षीय संमतीने ही कररचना आणली आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार केवळ जीएसटी काऊन्सिलला आहे. केंद्र सरकारमधील केवळ अर्थमंत्री या काऊन्सिलमध्ये आहेत. तसेच सर्व राज्यांचे अर्थमंत्री सदस्य आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही बदल करण्याबाबतचा निर्णय घेवू शकत नाहीत. काऊन्सिलमध्ये सामूहिकपणे निर्णय घेतला जातो. आता जीएसटी स्वीकारायला हवा. या करप्रणालीत काळा बाजार करताच येणार नाही. संगणकप्रणालीमुळे बोगस व्यापारी लगेच काळ्या यादीत जातील. कररचना तसेच अंमलबजावणीत काही त्रुटी असल्या तरी डोक्याला बंदूक लावून त्या सुधारणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढला जाईल.’ कृष्णकुमार गोयल, राजेंद्र गुगळे, वालचंद संचेती, सूर्यकांत पाठक, ब्रिजमोहन शर्मा यांनी जीएसटीबाबत विविध मते व्यक्त करीत अडचणी मांडल्या. काँग्रेस संभ्रमावस्थेत ‘जीएसटी’चे सर्वांकडून स्वागत होत असले तरी काही राजकीय पक्ष नाराज आहेत. जीएसटीच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही १८ टक्केपेक्षा जास्त कर नको, असे म्हटले. काँग्रेस सध्या संभ्रमावस्थेत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास आगामी निवडणुकीत मोठा विरोधी पक्ष राहील की नाही, हे सांगता येणार नाही.- पीयूष गोयल, केंद्रीय ऊजामंत्री