शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

तिसरी आघाडी नको; आपले गड मजबूत करा - पवार यांचा ममता बॅनर्जी यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 6:26 AM

भाजपाविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी न करू नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या गळी उतरविले असल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे पवार यांनी त्यांना सांगितल्याचे कळते. पवार गेले महिनाभर समविचारी पक्षांशी या संदर्भात चर्चा करीत आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : भाजपाविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी न करू नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या गळी उतरविले असल्याचे समजते. तिसऱ्या आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे पवार यांनी त्यांना सांगितल्याचे कळते. पवार गेले महिनाभर समविचारी पक्षांशी या संदर्भात चर्चा करीत आहेत.मोदीविरोधी पक्षांनी आपापल्या राज्यात स्वत:चे गड अधिक बळकट करावेत आणि जिथे भाजपाला पराभूत करणे शक्य आहे, तिथे तेथील स्थितीप्रमाणे जागावाटप करावे, असे पवार यांचे म्हणणे आहे. असे महाराष्ट्रात करण्याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली असून, त्यास त्यांची मान्यता असल्याचे सांगण्यात येते.याचप्रकारे, उत्तर प्रदेशात सपा-बसपा एकत्र आले असून, काँग्रेसही त्यांना साथ देईल. बिहारमध्ये राजद व काँग्रेस यांचे सहकार्य असेल. त्यामुळे ममता यांनी ईशान्य भारताच्या सात राज्यांतील २५ जागांबाबत तेथील प्रादेशिक पक्षांशी बोलावे, त्यांना काँग्रेस मदत करेल. त्यामुळे भाजपाचा पराभव करणे शक्य होईल, असे त्यांनी बॅनर्जी यांना सांगितल्याचे कळते.दीदी भेटणार अनेक नेत्यांनामात्र, ममता बॅनर्जी यांनी तिसºया आघाडीची कल्पना पुरती सोडून दिलेली नाही. बॅनर्जी यांना भेटण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जसे कोलकात्याला गेले, त्याचप्रमाणे द्रमुक, तेलगू देसम, तसेच सपा व बसपाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी त्या चेन्नई, अमरावती व लखनौला जाणार आहेत.अखिलेश यांचेही मत तेच...सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही तिसरी वा वेगळी आघाडी करण्याच्या मताचे नाहीत. मोदी विरुद्ध आघाडी असे चित्र २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले, तर आमच्याविरोधात लढण्यासाठी सर्व संधीसाधू पक्ष एकत्र आले, अशी टीका भाजपा करेल. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या ताकदीनुसार व अन्य पक्षांच्या मदतीने भाजपाविरोधात लढणेच योग्य ठरेल. त्यामुळे आधी भाजपाला पराभूत करू आणि कसे जुळवायचे हे ठरवू. लालू, ममताजी, मायावतीजी, आम्ही सारे जबाबदार पक्ष आहोत. त्यामुळे नंतरचे ठरवणे अवघड वा अडचणीचे नाही.- अलीकडेच अखिलेश यादव महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघात गेले होते. दिवसभर ते तिथे होते. प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांनी पुढील व्यूहरचनेबाबत चर्चाही केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी