शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी फक्त बोलू नका, करुन दाखवा - असदुद्दीन ओवेसी

By admin | Updated: June 29, 2017 17:10 IST

गो-रक्षणाच्या नावाखाली सुरु असलेल्या हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला निषेध फक्त शाब्दीक असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - गो-रक्षणाच्या नावाखाली सुरु असलेल्या हिंसाचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला निषेध फक्त शाब्दीक असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी नोंदवलेला निषेध फक्त शब्दांचा खेळ आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही अशी टीका असदुद्दीन ओवेसी, ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने केली आहे. मोदींनी फक्त शब्दांचा खेळ केला. ते जे बोलले तसे त्यांनी करुन दाखवावे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये अंतर आहे अशी टीका ओवेसींनी टि्वटरवरुन केली आहे. 
 
मोदी या मुद्यावर दोनदा बोलले पण त्याचा काही परिणाम दिसून आला नाही. मागच्यावर्षी दादरीमध्ये घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरुन मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केल्यानंतर मोदी या विषयावर बोलले होते. पण त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. गो-रक्षकांना भाजपा आणि संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो असे टि्वट ओवेसींनी केले आहे. 
 
पहलू खानची हत्या करणा-या तिघांना अजून का अटक झालेली नाही ? याचे कारण राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे असे टि्वट ओवेसींनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टि्वट करुन गो-रक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्येचा निषेध केला आहे. हे सर्व थांबले पाहिजे. शब्द पुरेसे नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. 
 
सध्या देशात जे वातावरण आहे ते कोणी तयार केले ? हा प्रश्न पंतप्रधानांनी स्वत:ला विचारावा. फक्त निषेध नोंदवून भागणार नाही अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली. लोक पंतप्रधानांचे शब्द गांर्भीयाने घेतील अशी अपेक्षा करुया असे नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लाह यांनी म्हटले आहे. 
 
गुरुवारी अहमदाबादमध्ये बोलताना गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना दिला. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांचं हे वक्तव्य आलं आहे. उस्मान अन्सारी यांच्या घराजवळ गाय मृतावस्थेत आढळली असता सुमारे १०० जणांच्या जमावाने घरात घुसून अन्सारी यांना मारहाण केली, तसेच त्यांच्या घराला आग लावली.