पुडुचेरी : तामिळनाडू आणि पुडुचेरीत पूरग्रस्तांच्या मदतीवरून राजकारण होता कामा नये. राजकारणापेक्षा अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी येथे म्हणाले.राहुल गांधी नवी दिल्लीहून विशेष विमानाने पुडुचेरीच्या पूरप्रभावित रोदियरपेट, शान्मुघनगर आणि एचानकादू येथे पोहोचले. या ठिकाणी त्यांनी पूरग्रस्तांना मदत साहित्याचे वाटपही केले. (वृत्तसंस्था)
‘पूरग्रस्तांच्या मदतीत राजकारण नको’
By admin | Updated: December 8, 2015 23:21 IST