शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जवानांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, मेहबूबा मुफ्तींची चेतावणी

By admin | Updated: June 23, 2017 15:59 IST

जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर तैनात असलेल्या डीएसपी मोहम्मद अयुब पंडित यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर तैनात असलेल्या डीएसपी मोहम्मद अयुब पंडित यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना अत्यंत लाजिरवाणी असल्याचं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरमधील लोकांना चेतावणीदेखील दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना त्यांनी सांगितलं की, "जर पोलिसांच्या संयमाचा हा परिणाम असेल तर येणा-या दिवसांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे असं किती दिवस चालणार आहे ? जर असंच चालू राहिलं तर जसं आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळ काढायचे तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते", असं मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. 
 
(जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर जमावाकडून पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या)
 
मेहबूबा मुफ्ती डीएसपी पंडित यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, "यापेक्षा लाजिरवाणं काय असू शकतं ? डीएसपी पंडित तिथे लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. पोलीस येथील लोकांसोबत जास्तीत जास्त संयमाने वागत आहे. लोकांना हे समजलं पाहिजे. आपल्या वागण्यात बदल करण्यासाठी अजूनही लोकांकडे वेळ आहे".
 
जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं मशिदीबाहेर मोहम्मद आयुब पंडित यांची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर  पोलिसांनी ट्विट करून या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी ते तैनात होते.
 
रमजानच्या महिन्यातील शेवटचा शुक्रवार लक्षात घेता मशिदीबाहेरच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडायला नको यासाठी पोलिसही गस्त घालत होते. यावेळी जामिया मशिदमध्ये  "शब-ए-कद्र"ची प्रार्थना सुरू होती. रमजानमधील नमाज पठण असल्यानं खबरदारी म्हणून मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. . तिथे पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडितही तैनात होते. ते मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. हत्या करण्याआधी त्यांना निर्वस्त्र करण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.