शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जमीन बळकावू देणार नाही

By admin | Updated: May 12, 2015 23:29 IST

संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

नवी दिल्ली : संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केला. काँग्रेस पक्ष या ‘सुटाबुटाच्या सरकार’ला शेतकऱ्यांची जमीन बळकावू देणार नाही आणि संसदेत जर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही, तर शेतकऱ्यांची ही लढाई लढण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले.काँग्रेस या भूसंपादन विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करणार, असे लोकसभेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी निक्षून सांगितले. ते म्हणाले, ‘या सरकारला भूसंपादन विधेयक पारित करण्याची घाई झालेली आहे. पण हे तेवढे सोपे नाही. आम्ही हे विधेयक संसदेत रोखू शकलो नाही, तर रस्त्यावर जाऊन रोखणार. हे भूसंपादन विधेयक आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मानेवर कुऱ्हाड चालविली आहे.’ जलद विकासासाठी हे भूसंपादन विधेयक आणले असल्याच्या मोदी सरकारच्या दाव्यातील हवा काढताना राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘जमिनीअभावी १०० पैकी केवळ ८ प्रकल्प अडकलेले असल्याचे वित्त मंत्रालयानेच एका आरटीआयच्या उत्तरात सांगितले आहे. केंद्र सरकारकडे जमीन आहे, राज्यांकडे जमीन आहे आणि ‘सेझ’अंतर्गत अधिग्रहित करण्यात आलेली ४० टक्के जमीन अद्याप रिकामी पडलेली आहे. मग सरकार शेतकऱ्यांची जमीन बळकावण्यावर का अडून बसले आहे? मोदी सरकार शेतकऱ्यांची जमीन भांडवलदार आणि आपल्या औद्योगिक मित्रांना देऊ इच्छिते. कारण हे सुटाबुटातील सरकार आहे. संपुआ सरकारला भूसंपादन विधेयक आणण्यासाठी दोन वर्षे लागली होती; परंतु रालोआ सरकारने काही दिवसांतच त्या विधेयकाची हत्या केली.’ (प्रतिनिधी)