शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कळत नाही मोदींनी तुम्हाला मुख्यमंत्री का बनवलं? राखी सावंतची योगींवर टीका

By admin | Updated: July 9, 2017 19:00 IST

वादग्रस्त विधानं करून नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी राखी सावंतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - वादग्रस्त विधानं करून नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी राखी सावंतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी लागणारे कोणतेच गुण आदित्यनाथ यांच्याकडे नाहीत, कळत नाही तुमचे कोणते गुण पाहून पंतप्रधान मोदींनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं अशा शब्दांमध्ये राखी सावंतने योगींवर खरमरीत टीका केली.  
 
मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राखी सावंतने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर चौफेर हल्ला चढवला. कत्तलखाने बंद करण्याच्या योगी आदित्यनाथांच्या निर्णयाला राखीने यावेळी कडाडून विरोध केला. मुसलमानांनी बीफ खाऊ नये हे सांगण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असा सवालही तिने उपस्थित केला आहे. नेहमी वादामध्ये राहणारी राखी आदित्यनाथांचा उल्लेख करताना पुढे म्हणाली, जर तुम्ही स्वतः हिंदू आहात तर तुम्ही इतर सगळ्यांना हिंदू बनवू शकत नाही. ज्याप्रकारे मुसलमान तुमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्याप्रमाणे तुम्हीही त्यांच्या मुद्द्यांपासून दूर रहावं. हिंदू लोकं मुस्लिमांना दगडाने ठेचून मारत आहेत हा कोणता न्याय आहे योगी जी असा सवाल तिने केला.  
(कोणतेही आरोप करायला मी सलमान नाही - राखी सावंत
(बोल्ड आणि बिनधास्त राखी सावंतचा एमएमएस झाला लिक)
(राखी सावंतच्या आंगोपांग झळकले मोदी)
 
हे बोलताना राखीने आदित्यनाथांना 20 वर्षांपर्यंत खुर्चीत बसण्यासाठी मुसलमानांसोबतच सर्व धर्मीयांची साथ द्यावी, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण करावं, केवळ हिंदूंची जय-जय करून चालणार नाही असा सल्लाही राखीने देऊन टाकला. याबाबतचा एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. 
पाहा व्हिडीओ-
 
 

दरम्यान 7 जुलै रोजी अभिनेत्री राखी सावंत बुरखा परिधान करुन लपूनछपून गुरुवारी पंजाबमधील लुधियाना कोर्टात हजर झाली होती. रामायणकार वाल्मिकी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर राखी सावंतविरोधात लुधियाच्या न्यायदंडाधिकारी कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टात हजर झाल्यानतंर न्यायाधीश विश्व गुप्ता यांनी राखी सावंतला जामीन मंजूर केला. राखी सावंतविरोधात 2 जून रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. वारंवार समन्स बजावूनही राखी 9 मार्चला  सुनावणीसाठी कोर्टात हजर न राहिल्याने तिला समन्स बजावण्यात आलं होतं.