शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दलिताच्या घरी जाऊन मागविले हॉटेलचे जेवण , उत्तर प्रदेशात भाजपा मंत्र्याचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 07:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाचे खासदार, आमदार व मंत्र्यांना दलित वस्त्यांमध्ये जाऊन राहण्याच्या, त्यांच्या घरी रात्री राहून जेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाचे खासदार, आमदार व मंत्र्यांना दलित वस्त्यांमध्ये जाऊन राहण्याच्या, त्यांच्या घरी रात्री राहून जेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपाचे मंत्री सुरेश राणा यांनी त्याचे पालन केलेत्र, पण हॉटेलातून जेवण मागवून ते दलिताच्या घरी जेवले. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.मंत्री जेवायला येणार, हे अलिगड जिल्ह्यातील लोहगडमधील एका दलित कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ मला घरी थांबा, असा निरोप मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला होता, असे कुटुंबप्रमुखाने सांगितले.पण राणा यांच्या कार्यकर्त्यांनीच सारा कार्यक्रम तयार केला होता. त्याप्रमाणे राणा व कार्यकर्ते रात्री ११ वाजता त्या घरी पोहाचेले. तिथे कार्यकर्त्यांनी राणा यांच्यासाठी हॉटेलातून तंदूर रोटी, दाल माखनी, मटार पनीर, गुलाब जामून असे खाद्यपदार्थ मागवले. मिनरल पाण्याच्या बाटल्याही आणल्या. मंत्रीमहोदय व त्यांच्यासह आलेल्यांनी त्या जेवणाचा आस्वाद घेतला.मात्र राणा यांनी स्वत:वरील आरोप अमान्य केला. १00 जण तिथे गेले होते. एवढ्या सर्वांसाठी तिथे जेवण असणे शक्यच नव्हते. त्यामुळे बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यात आले.उलट ते आपल्याकडे जेवतील, तेव्हा आपण पवित्र होऊ , असेही त्या म्हणाल्या. दलितांच्या घरी जाणे, त्यांच्यासह जेवणे हे प्रकार आताजुने झाले आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, दलितांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे आहेत.दुसरीकडे भाजपाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आपण कधीच दलितांच्या घरी जेवायला जात नाही. त्यांनाच जेवायला बोलावते. त्यांच्याकडे जेवायला मी काही श्रीराम नाही, असे विधान केले आहे. मी त्यांच्या घरी जेवल्यामुळे त्यांचे घर पवित्र होणार नाही.