शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'लॉलिपॉप नका देऊ, राम मंदिर बांधा', भाजपाला घरचा अहेर

By admin | Updated: October 18, 2016 16:51 IST

भाजपा खासदार विनय कटियार यांनी रामायण संग्रहालय प्रस्ताव हा फक्त लॉलिपॉप असल्याची टीका करत पक्षाला घरचा अहेर दिला आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - अयोध्येत रामायण संग्रहालय बांधण्यासाठी केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारने स्वतंत्र प्रस्ताव ठेवले आहेत. मात्र भाजपा खासदार विनय कटियार यांनी  रामायण संग्रहालय प्रस्ताव हा फक्त लॉलिपॉप असल्याची टीका करत पक्षाला घरचा अहेर दिला आहे. 'राम मंदिर बांधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण गरजेचं आहे. संग्रहालयाच्या नावाने कुणीही आमच्या हाती लॉलीपॉप देऊ नये,' असं विनय कटियार बोलले आहेत.
 
'आम्हाला फक्त राम मंदिर हवं आहे, दुसरं काहीही नाही' असं बोलताना उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्याने या मुद्यावर बोलत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीदरम्यान विकास आमचा मुख्य अजेंडा असणार आहे या केंद्राच्या भुमिकेवर विचारलं असता 'विकास गरजेचा आहे, पण राम मंदिर झालंच पाहिजे,' असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे.
 
 
विनय कटियार यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांच्यावरही टीका करत 'राज्य सरकार राम मंदिरासाठी काहीच हालचाल करत नाही, हे तेच सरकार आहे ज्यांनी मंदिरासाठी आवाज उठवणा-या कारसेवकांची हत्या केली होती', असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत सर्वजण राम मंदिराच्या नावे आमच्या हाती लॉलिपॉप देण्याचा प्रयत्न करत असल्याचं विनय कटियार बोलले आहेत.
 
विनय कटियार यांनी भाजपा नेतृत्वाला आव्हान देत 'लोकसभेत आपलं बहुमत आहे, राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने कायदा आणावा,' असं म्हटलं आहे.
 
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्यासोबत अयोध्या मंदिराला भेट देण्यासाठी का गेला नाहीत ? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. 'अयोध्येत मी गेलो की मला नेहमी राम मंदिर कधी बांधणार असा प्रश्न तेथील लोक विचारत असतात. मी नाही गेलो ते बरे झाले,' असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.