शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बदलांनी विचलित होऊ नका, व्यवसायाकडे लक्ष द्या

By admin | Updated: October 26, 2016 05:15 IST

कंपनीच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वात झालेल्या बदलांनी विचलित होऊ नका, आपल्या व्यवसायाकडे, तसेच बाजारातील नेतृत्वाकडे लक्ष द्या, असे आवाहन टाटा सन्सचे

मुंबई : कंपनीच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वात झालेल्या बदलांनी विचलित होऊ नका, आपल्या व्यवसायाकडे, तसेच बाजारातील नेतृत्वाकडे लक्ष द्या, असे आवाहन टाटा सन्सचे नवे चेअरमन रतन टाटा यांनी मंगळवारी केले. आपली चेअरमनपदी झालेली निवड हंगामी स्वरूपाची आहे, नवा चेअरमन लवकरच शोधला जाईल, असेही टाटा यांनी सांगितले.सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर, रतन टाटा यांनी काल टाटा सन्सच्या सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर, आज त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. टाटाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये झालेली ही बैठक तीन तास चालली. उद्योग समूहाच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून, नंतर रतन टाटा यांच्या भाषणाचा तपशील माध्यमांना देण्यात आला. नेमले दोन नवे संचालकटाटा सन्सवर मंगळवारी राल्फ स्पेथ आणि एन. चंद्रशेखरन यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्पेथ या समुहातील जग्वार लॅण्ड रोव्हर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर चंद्रशेखरन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. (प्रतिनिधी)आपण सगळे मिळून समूहाची बांधणी करू या...टाटा यांनी सांगितले की, समूहाच्या कंपन्यांनी बाजारातील स्थान आणि स्पर्धा याकडे लक्ष द्यावे. आपल्या भूतकाळाशी तुलना करू नये. अनुयायीत्व पत्करण्यापेक्षा नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न करा. आम्ही आढावा घेऊ. गरजेनुसार निर्णय घेतले जातील. बदल झाल्यास तुमच्याशी चर्चा केली जाईल.मी तुमच्यासोबत काम करण्याबाबत आशावादी आहे. कारण भूतकाळात मी तुमच्यासोबत काम केलेले आहे. संस्थेने नेहमीच नेतृत्व करणाऱ्यांवर मात करून पुढे गेले पाहिजे. मला तुमचा अभिमान वाटतो. आपण सगळे मिळून या समूहाची बांधणी करू या. बैठकीवेळी, बॉम्बे हाउसबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती.