शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

‘भारतमाता की जय’ची बळजबरी नको - भागवत

By admin | Updated: March 29, 2016 01:56 IST

‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील,

लखनौ : ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील, असा भारत आम्हाला घडवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.लखनौ येथे भारतीय किसान संघाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, जेथे लोक उत्स्फूर्तपणे भारतमाता की जय म्हणतील, असा श्रेष्ठ भारत आम्हाला घडवायचा आहे. त्यामुळे कुणावर हा नारा थोपविला जाता कामा नये. ‘भारतमाता की जय’च्या घोषणेवरून निर्माण झालेला वाद निरर्थक आहे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे ठरते. भागवत म्हणाले, ‘आम्हाला (भारत) आमचे जीवन आणि कर्मामधून जगातील लोकांना मार्ग दाखवायचा आहे. कुणाला पराभूत करायची वा जिंकायची आमची इच्छा नाही. आम्हाला कुणावरही आमचे विचार आणि विचारसरणी थोपवायची नाही. आम्हाला केवळ त्यांना मार्ग दाखवायचा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे अंग आहे. संपूर्ण जगापुढे आम्हाला स्वत:चे आदर्श उदाहरण निर्माण करावयाचे आहे.’ (वृत्तसंस्था)