शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल इंडिया’ नको, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या!

By admin | Updated: February 22, 2016 01:19 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी

- नितीन अग्रवाल, नवी दिल्लीकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यावे, असे भारतीयांना वाटत आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात लोकांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यापेक्षा सरकारने कृषी क्षेत्रास प्राधान्य द्यावे, असे लोकांना वाटते आहे.अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या सर्वेक्षणात चार प्रमुख वर्ग, चार क्षेत्र. समाजाचे चार घटक आणि सरकारी योजनांबाबत लोकांचे मत विचारले गेले होते. अर्थसंकल्पात शेतकरी, युवा व महिला, मध्यमवर्गीय व निम्न वर्ग यापैकी कुणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जायला हवे, असे मंत्रालयाने विचारले होते. सर्वेक्षणात सामील लोकांपैकी सर्वाधिक ५७ टक्के लोकांनी शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. २७ टक्के लोकांनी मध्यमवर्ग, १० टक्के लोकांनी महिला व युवा तसेच ६ टक्के लोकांनी निम्न वर्गास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कृषी उत्पादन व पायाभूत आराखडा, सेवा आणि स्टार्ट-अप्स यातही लोकांनी कृषीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले.मायक्रो ब्लॉगिंग साईट टिष्ट्वटरवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात सुमारे १५,५०० लोकांनी भाग घेतला. शहरी लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या टिष्ट्वटरवर कृषी आणि शेतकरी यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त झाल्याने सरकारलाही धक्का बसला. डिजिटल तंत्राचा वापर करणाऱ्यांंनीच डिजिटल इंडियाबाबत अनास्था दाखवणे, याबाबतही सरकारने आश्चर्य व्यक्त केले.