शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’मध्ये आता ‘तोडू नका, जोडा’

By admin | Updated: March 18, 2015 00:15 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तोडू नका, जोडा’ असे सांगत पक्षातील अंतर्गत कलह शमविण्याचे काम हाती घेतले.

समेटाचा प्रयत्न : संजय सिंग, कुमार विश्वास भेटले यादवांनानवी दिल्ली : बेंगळुरूतील १२ दिवसांच्या उपचारानंतर दिल्लीला परतताच आम आदमी पार्टीचे (आप) सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तोडू नका, जोडा’ असे सांगत पक्षातील अंतर्गत कलह शमविण्याचे काम हाती घेतले. याअंतर्गत केजरीवाल गोटातील नेत्यांनी सोमवारी रात्री उशिरा योगेंद्र यादव यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले.प्रशांत भूषण यांनी केजरीवालांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. मंगळवारी केजरीवालांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच भेटू, असा शब्द त्यांनी भूषण यांना दिला. केजरीवाल उपचारासाठी दिल्लीबाहेर असल्यामुळे त्यांच्या माघारी पक्षातील कलह चव्हाट्यावर आला होता. यादव व प्रशांत भूषण, तसेच केजरीवाल गट यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप आरंभले होते.सोमवारी रात्री उशिरा केजरीवाल गटातील संजय सिंह, कुमार विश्वास, आशुतोष आणि आशिष खेतान हे योगेंद्र यादव यांना भेटण्यासाठी पोहोचले. पहाटे तीन वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती.ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे यानंतर आप नेत्यांनी सांगितले. गत काही दिवसांत पक्षातील घटनाक्रमामुळे आम्ही व्यथित होतो. आम्ही योगेंद्र यादवांशी चर्चा सुरू केली. सुरुवात चांगली राहिली, अशा आशयाचे टिष्ट्वट संजय सिंह यांनी बैठकीनंतर केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)मानहानी प्रकरणाची सुनावणी करीत असलेल्या एका न्यायालयाने फटकारल्यानंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच योगेंद्र यादव मंगळवारी दुपारी न्यायालयासमक्ष हजर झाले. न्यायालयाने या तिघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबतच्या आदेशासाठी २ मे ही तारीख निश्चित केली.काय आहे प्रकरणपेशाने वकील असलेले सुरेंद्र कुमार शर्मा यांनी केजरीवाल, सिसोदिया आणि यादव यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. २०१३ मध्ये आम आदमी पार्टीने आपल्याला तिकीट देण्याचा शब्द दिला होता. यानंतर आपण उमेदवारी अर्जही भरला होता; मात्र नंतर आपले तिकीट रद्द करण्यात आले होते. यानंतर मीडियाशी बोलताना या तिन्ही नेत्यांनी आपल्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केले. यामुळे आपली प्रतिमा मलिन झाली, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.