शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सर्व अतिरेकी एका ‘विशिष्ट’ समाजातील का?

By admin | Updated: May 15, 2014 04:21 IST

नरेंद्र मोदींना मतदान न करणार्‍यांना भारतात जागा नाही, असे बोलून वादंग निर्माण करणारे भाजपा नेते गिरिराजसिंह यांनी बुधवारी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.

पाटणा/नवी दिल्ली : नरेंद्र मोदींना मतदान न करणार्‍यांना भारतात जागा नाही, असे बोलून वादंग निर्माण करणारे भाजपा नेते गिरिराजसिंह यांनी बुधवारी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. सर्व दहशतवादी एका ‘विशिष्ट’ समाजातील कसे? आणि स्वत:ला निधर्मी म्हणवणारे यावर शांत कसे?, असे बरळून त्यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे. ‘त्या’ समुदायातील सर्वच लोक दहशतवादी, असे मला म्हणायचे नाही़ पण ज्यांना अटक केली ते सर्वच एकाच समाजातील आहेत़ दहशतवाद हा देशाशी निगडित मुद्दा आहे, विशिष्ट समुदायाशी नाही़ असे असतानाही स्वत:ला निधर्मी म्हणवून घेणारे यावर गप्प का? हे मतांच्या राजकारणासाठीची ‘फसवी धर्मनिरपेक्षता’ आहे, असे गिरिराज म्हणाले़ भाजपाच्या तिकिटावर नवादा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले गिरिराजसिंह यांच्याविरुद्ध यापूर्वीही प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ मोदींना मतदान करणार्‍यांना भारतात जागा नाही़ अशांनी पाकिस्तानात जावे, असे वादग्रस्त वक्तव्य निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केले होते़ तीव्र पडसाद गिरिराजसिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह विविध पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दहशतवाद कुठल्याही एका धर्माशी निगडित नाही़ बंदुकांच्या जोरावरील दहशतवाद जितका निंदनीय आहे, तितकाच विचारांचा दहशतवादही निंदनीय आहे़, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी दिली़