शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मुलगी झाल्यामुळे तलाक देणे ‘हराम’

By admin | Updated: September 24, 2015 09:12 IST

पत्नीने मुलीला जन्म दिला म्हणून तलाक देणे बेकायदा आणि ‘हराम’ (इस्लामविरोधी) असल्याचा फतवा दारुल- उलूम- देवबंद या प्रभावी इस्लामी धर्मसंस्थेने मंगळवारी जारी केला आहे.

लखनौ : पत्नीने मुलीला जन्म दिला म्हणून तलाक देणे बेकायदा आणि ‘हराम’ (इस्लामविरोधी) असल्याचा फतवा दारुल- उलूम- देवबंद या प्रभावी इस्लामी धर्मसंस्थेने मंगळवारी जारी केला आहे. वादग्रस्त फतव्यांसाठी परिचित असलेल्या दारुल उलूमचा हा फतवा मात्र मुस्लिमांमधील पुरोगामी विचारसरणीच्या लोकांसाठी दिलासादायक मानला जातो.मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला तलाक दिल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही समोर आले असताना हा फतवा तडकाफडकी जारी करण्याचे कारणही तसेच आहे. मुझफ्फरनगरमधील एक इसम रियाधमध्ये काम करतो. त्याने चौथीही मुलगी झाल्याचे कळताच रियाधहून पत्नीला फोन करून तलाक दिल्याने हे प्रकरण पंचायतीकडे गेले होते. पंयायतीने तलाक मंजूर केल्यानंतर कुणीतरी दारुल-उलूमचा सल्ला मागितला होता.फोनवरून तलाकही गैरच या महिलेला फोनवरून तलाक देण्यात आल्याबद्दल या धर्मसंस्थेचे प्रवक्ते अश्रम उस्मानी यांनी संताप व्यक्त केला. हजारो मैल अंतरावर असलेल्या सहचारिणीला फोनवरून तलाक देणे संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले. ही अमानवी वर्तणूक असून पती-पत्नीचे नाते, असे कृत्य पाहता इस्लामविरोधी ठरते. स्थानिक पंचायतीने या प्रकरणी महिलेची बाजू योग्य न मानणे दुर्दैवी आहे. इस्लाममध्ये अशा प्रकारचा तलाक पूर्णपणे अस्वीकारार्ह (हराम) ठरतो, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)