शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टातच तलाक, तलाक तलाक! पत्नी, मुलीला सोडून पतीने काढला पळ

By admin | Updated: April 18, 2017 12:50 IST

ट्रिपल तलाकचा मुद्दा गरम असतानाच उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील गोंडा येथील न्यायालयात

नवी दिल्ली, दि. 18 -  ट्रिपल तलाकवरून देशातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वैचारिक घुसळण सुरू आहे.  ट्रिपल तलाकचा गैरफायदा घेतला जात आहे का याची चर्चा सुरू आहे. एकंदरीत ट्रिपल तलाकचा मुद्दा गरम असतानाच  उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील गोंडा  येथील न्यायालयात एक पती आपल्या पत्नीला तलाक तलाक तलाक म्हणून फरार झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पत्नीला जबर धक्का बसला असून, पतीच्या कृत्यानंतर ती बेशुद्ध झाली आहे.  
फैजाबाद येथील गोंडामधील एका दिवाणी न्यायालयात असलेल्या कौटुंबिक न्यायालयात पोटगीसंबंधी दाव्यावर सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. पत्नीला ट्रिपल तलाक दिल्यानंतर  त्या पतीने तेथून पळ काढला. अनपेक्षित घटनेमुळे धक्का बसल्याने पत्नी तेथेच बेशुद्ध पडली. तर आपली आई बेशुद्ध पडल्याचे पाहून तिच्या लहान मुलीला रडू कोसळले. 
रुकैया खातून असे तलाक देण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, 2014 साली तिचा  निकाह महफूझ अहमद याच्याशी झाला होता.   निकाहानंतर महफूझ याने रुकैया हिच्याकडे विविध वस्तूंची मागणी केली. मात्र मागणीची पूर्तता होत नसल्याने त्याने रुकैया हिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने पतीसह सहा जणांविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार नोंदवली. तसेच पोटगीची मागणी केली. मात्र आज न्यायालयात सुनावणी असतानाच महफूझने रुकैया हिला तलाक दिला. 
दरम्यान, या घटनेनंतर मौलाना खालिद रशीद फरंगी यांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत महफुझला वाळीत टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. महफूझ याच्या घराजवळील मशिदीतून याची घोषणा होईल, असेही ते म्हणाले.