प्रभाग-८- गोरेवाडा-४
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
अंतर्गत रस्ते व्हावेत - मनीष चव्हाण प्रभागात केवळ मुख्य रस्त्यांचेच काम हाती घेण्यात आले आहेत. वस्तीतील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब आहेत. त्या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात यावे. तसेच पथदिवे सुरू करावे. दहनघाट सुरूव्हावा - राकेश सपकाळ प्रभागात एकमेव दहनघाट आहे. सुरक्षा भिंत बांधून तो सुरक्षित करण्यात आला आहे. स्मशानभूमीतील झाडी-झुडपी काढली ...
प्रभाग-८- गोरेवाडा-४
अंतर्गत रस्ते व्हावेत - मनीष चव्हाण प्रभागात केवळ मुख्य रस्त्यांचेच काम हाती घेण्यात आले आहेत. वस्तीतील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब आहेत. त्या रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात यावे. तसेच पथदिवे सुरू करावे. दहनघाट सुरूव्हावा - राकेश सपकाळ प्रभागात एकमेव दहनघाट आहे. सुरक्षा भिंत बांधून तो सुरक्षित करण्यात आला आहे. स्मशानभूमीतील झाडी-झुडपी काढली आणि लाकडांची व्यवस्था करून दिली तर तो लवकर सुरू होऊ शकतो. कारण येथील लोकांना दोन ते तीन किलोमीटर दूर असलेल्या मानकापूरला जावे लागते. तेव्हा दहनघाट तातडीने सुरू व्हावा. अवैध धंदे बंद व्हावे - माणिक झोडापे प्रभागात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. स्मशानभूमीमध्ये सर्रास जुगार अड्डा भरवला जातो. त्यामुळे सर्वात अगोदर अवैध धंदे बंद व्हावेत. स्मशानभूमीचा विकास केल्यास आणि तिथे एखादा चौकीदार ठेवल्यास यावर काही प्रमाणात आळा बसू शकेल. मुलांसाठी मैदान व उद्यान व्हावे - प्रकाश मंडलवार वस्तीमध्ये एकही मैदान नाही. त्यामुळे मुलं रस्त्यांवरच खेळतात. लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात यावे. तसेच लहान मुले व मोठ्यांसाठी वस्तीमध्ये एखादे लहानचे उद्यानसुद्धा असावे. गटारांची सफाई व्हावी - दीप्ती मुनघाटे गोरेवाडा वस्तीतील गटारी अतिशय खराब झाल्या आहेत. त्या नेहमीच चोक होतात. त्यामुळे या गटारींची व्यवस्था करावी. तसेच वस्तीमध्ये नियमित सफाई करण्यात यावी. रस्त्यांवरील पथदिवे सुरू करावे - सुरेखा भांगे गोरेवाडा वस्ती ते बोरगावपर्यंतच्या रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असतात. गोरेवाडा वस्तीपूर्वी लागणाऱ्या पुलाजवळचे दिवे बंद राहतात. त्यामुळे महिलांना भीती असते. सायंकाळनंतर बाहेर पडायला भीती वाटते. तेव्हा रस्त्यावरील पथदिवे सुरू व्हावेत, अशी अपेक्षा आहे.